रिझर्व्ह बँक विकतेय कमी दरात सोने; जाणून घ्या सविस्तर आणि घ्या फायदा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2021 :-जर आपण सोन्यात गुंतवणूक सुरू करण्याचा विचार करत असाल तर सरकारने तुमच्यासाठी चांगली संधी आणली आहे. सरकारने गोल्ड बॉन्ड्स 2020-21 (सीरीज XI ) जाहीर केली आहे. या गोल्ड बाँडमध्ये आपण 1 फेब्रुवारी ते 5 फेब्रुवारी 2021 पर्यंत सब्सक्रिप्शन साठी खुला असेल.

आरबीआयने नमूद केले आहे की या बॉन्डचे नाममात्र मूल्य 4912 रुपये निश्चित झाले आहे. बाँडची किंमत इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन लिमिटेड (आयबीजेए) यांनी 27 ते 29 जानेवारी दरम्यानच्या 999 शुद्धतेच्या सरासरी क्लोजिंग प्राइसच्या आधारे निश्चित केली आहे.

या बाँडची सेटलमेंट तारीख 9 फेब्रुवारी 2021 आहे. महत्त्वाची बाब म्हणजे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारी रोजी 2021-22 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करतील. मोदी सरकारच्या दुसर्‍या कार्यकाळातील हे तिसरे बजेट असेल. कोरोना साथीच्या आणि त्यानंतरच्या आर्थिक संकटामुळे हे बजेट खूप महत्वाचे ठरले आहे.

आपण किती काळ स्वस्त सोनं खरेदी करू शकता ते जाणून घ्या :- आरबीआयने या निवेदनात असेही म्हटले आहे की ऑनलाईन पेमेंट आणि या बाँडची खरेदी करणाऱ्या गुंतवणूकदारांना प्रति ग्रॅम 50 रुपये सवलत देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. अशा गुंतवणूकदारांसाठी या सोन्याच्या बाँडची किंमत प्रति ग्राम 4862 रुपये असेल.

सीरिज एक्स गोल्ड बाँडची इश्यू किंमत प्रति ग्रॅम 5,104 रुपये होती. हा इश्यू 11 जानेवारी ते 15 जानेवारी दरम्यान सब्सक्रिप्सन साठी खुला होता. 1 फेब्रुवारी ते 5 फेब्रुवारी 2021 दरम्यान सुरू होणार्‍या सॉवरेन गोल्ड बाँडची 11 व्या सीरीज मध्ये मिनिमम 1 ग्रॅम आणि जास्तीत जास्त 4 किलो सोन्याची गुंतवणूक होऊ शकते.

ही गुंतवणूक मर्यादा वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी आहे. त्याच वेळी एचयूएफ 4 किलो पर्यंत गुंतवणूक करू शकेल तर ट्रस्ट त्यात 20 किलो पर्यंत गुंतवणूक करू शकतील. ही गुंतवणूक मर्यादा दर आर्थिक वर्षाच्या आधारावर लागू होईल.

येथून सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्कीम खरेदी करा :- सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्कीमअंतर्गत आपण एक ग्रॅम सोन्यात गुंतवणूक देखील करू शकता. आपण येथे एका वर्षात किमान एक ग्रॅम आणि जास्तीत जास्त 500 ग्रॅम सोनं खरेदी करू शकता.

खास गोष्ट म्हणजे सोन्याच्या बाँडमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला करात सूट देखील मिळते. आपण आपल्या बँक, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, पोस्ट ऑफिस, नॅशनल स्टॉक एक्सचेंज किंवा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज कडून सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्कीम खरेदी करू शकता.

2015 मध्ये किती रुपयांत सोने विकले होते ? :- सरकारने नोव्हेंबर 2015 मध्ये सॉवरेन गोल्ड बाँड योजना लागू केली. त्यावेळी गुंतवणूकदारांना प्रति ग्रॅम 2,684 रुपये सोने वाटप करण्यात आले. दुसरीकडे जर एखाद्याने सोन्याचे बाँड मिळविण्यासाठी ऑनलाईन पेमेंट केले असेल तर त्याला या सोन्याच्या बाँडअंतर्गत प्रति ग्राम 2634 रुपये दराने सोने वाटप केले गेले असेल.

त्याच वेळी इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या (आयबीजेए) वेबसाइटनुसार सोन्याची किंमत सध्या प्रति ग्रॅम 5,135 रुपये आहे. अशा परिस्थितीत जर एखाद्याने सॉवरेन गोल्ड बाँड योजनेंतर्गत 2015 मध्ये सोने विकत घेतले असेल तर त्याचे पैसे जवळजवळ दुप्पट झाले आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24