Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Royal Enfield Bullet 350 : बुलेट खरेदीचे स्वप्न होणार पूर्ण! आता खरेदी करा फक्त 5,529 रुपयांमध्ये, पहा EMI ऑफर

Royal Enfield Bullet 350 : सध्या तरुणांमध्ये बुलेटची एक वेगळीच क्रेझ आहे. तसेच बुलेटची आताच नाही तर बाईक सादर झाल्यापासून ही बाईक अधिक लोकप्रिय आहे. मात्र बाईकची किंमत जास्त असल्याने अनेकांना ती खरेदी करता येत नाही.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

बुलेट बाईकची समाजात एक वेगळी ओळख आहे. ही बाईक खरेदी करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र बजेट कमी असल्याने ही बाईक खरेदी सर्वसामान्यांचे स्वप्न पूर्ण होत नाही. पण आता तुम्ही EMI प्लॅनद्वारे सहज बुलेट बाईक खरेदी करू शकता.

346CC च्या शक्तिशाली इंजिन

तुम्हालाही 350 सीसी इंजिन असलेली बुलेट बाईक खरेदी कार्याची आहे तर तुम्ही कमी किमतीमध्ये खरेदी करू शकता. रॉयल एनफील्डचे बुलेट 350 मॉडेलमध्ये 346cc सिंगल सिलेंडर 4 स्ट्रोक इंजिन देण्यात येते.

तसेच हे इंजिन 5250 rpm वर 19.39 Ps पॉवर आणि 28Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. बुलेट बाईक शक्तिशाली इंजिनसह जबरदस्त फीचर्ससाठी ओळखली जाते. बुलेट बाईकचा लूक आणि आवाजामुळे ती ग्राहकांमध्ये अधिक लोकप्रिय आहे.

बुलेट 350 च्या चाचणी दरम्यान लीक झालेले चित्र

रॉयल एन्फिल्डकडून बुलेटच 350चे मॉडेल अद्याप लॉन्च करण्यात आलेले नाही. मात्र लवकरच कंपनीकडून बुलेट 350 मॉडेल लॉन्च केले जाऊ शकते. कारण कंपनीकडून बुलेट 350 ची चाचणी करतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

व्हायरल झालेल्या फोटोमध्ये ब्रेकिंग सिस्टममध्ये, तुम्हाला पुढील चाकांमध्ये डिस्क ब्रेक तर मागील चाकांमध्ये ड्रम ब्रेक देण्यात आले असल्याचे दिसत आहे. मात्र कंपनीकडून अद्याप याबाबत कोणतीही माहिती स्पष्ट करण्यात आलेली नाही.

किंमतीसह मायलेज किती असेल

कंपनीकडून अद्याप माहिती स्पष्ट करण्यात आलेली नसली तरीही बुलेट 350 मॉडेलची एक्स शोरूम किंमत 1.54 लाख रुपये असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

तसेच जर तुमचे बजेट कमी असेल तर तुम्ही दरमहा 5,529 रुपयांच्या EMIवर सहज ही बुलेट बाईक खरेदी करू शकता. नवीन बुलेट बाईकचे मॉडेल 35km मायलेज देणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.