PM Awas Yojana : केंद्र सरकारद्वारे देशातील गरीब नागरिकांसाठी पंतप्रधान आवास योजना सुरु केली आहे. या योजनेद्वारे ज्या नागरिकांना राहण्यासाठी घरे नाहीत अशा नागरिकांना पक्की घरे बांधण्यासाठी केंद्र सरकारकडून 2.50 लाख रुपये दिले जात आहेत.
जर तुम्हीही या योजनेद्वारे अर्ज केला असेल तर तुम्हालाही नवीन वर्षात घरकुल योजनेद्वारे पैसे मिळू शकतात. या पैशातून तुम्ही राहण्यासाठी पक्के घर बंधू शकता. सरकारने अशा लाभार्थ्यांची यादी जाहीर केली आहे.
ज्या नागरिकांनी या योजनेसाठी अर्ज केला आहे त्यांची प्रतीक्षा संपू शकते. सरकारने पंतप्रधान आवास योजनेची नवीन यादी जाहीर केली आहे. तुम्हीही या यादीत तुमचे नाव पाहू शकता.
जर तुमचे नाव सरकारने जाहीर केलेल्या पीएम आवास योजना नवीन यादी 2023 मध्ये असेल तर तुम्हाला पक्के घर बनवण्यासाठी सरकारकडून लवकरच तुमच्या खात्यावर 2.50 लाख रुपये पाठवले जातील.
PM आवास योजना 2023 चा लाभ कसा मिळवायचा?
जर तुमच्याकडे राहण्यासाठी पक्के घर नसेल तर तुम्हीही पंतप्रधान आवास योजनेसाठी अर्ज करू शकता. या योजनेतून केंद्र सरकारद्वारे २.५० लाख रुपयांचा लाभ दिला जात आहे. हे पैसे तुम्हाला घराचे काम जसे पूर्ण होईल तसेच टप्या टप्यांमध्ये मिळतील.
पंतप्रधान आवास योजना लाभार्थी यादी कशी तपासायची?
सर्वप्रथम पीएम आवास योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
वेबसाईटवर आल्यानंतर तुमच्या समोर एक होम पेज ओपन होईल, होम पेजवर तुम्हाला Report in Awassoft वर क्लिक करावे लागेल.
यानंतर चि. सोशल ऑडिट रिपोर्ट्समध्ये, तुम्हाला पडताळणीसाठी लाभार्थी तपशील या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
निवड फिल्टरमध्ये, तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा, तहसील आणि गाव निवडावे लागेल.
शेवटी, कॅप्चा कोड भरा आणि सबमिट वर क्लिक करा.
सबमिट वर क्लिक करताच संपूर्ण गावाची यादी तुमच्या समोर उघडेल.
अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गावाच्या लाभार्थी यादीत तुमचे नाव तपासू शकता.