अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी साधूने दिलं चक्क कोटींचं दान

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :-अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर निर्मितीसाठी देशभरातून निधी गोळा केला जात आहे. दरम्यान ऋषिकेशमधील एका साधूबाबांनी मंदिर उभारणीसाठी तब्बल एक कोटी रुपये दान केले आहेत.

83 वर्षांचे असणारे संत स्वामी शंकर दास गेल्या 60 वर्षांपासून गुहेतच राहतात. त्यामुळे त्यांनी हे पैसे कसे जमवले असा प्रश्न उपस्थित झाला होता.

दरम्यान त्यांनी असं स्पष्टीकरण दिलं आहे की त्यांचे गुरू टाट वाले बाबा यांच्या गुहेत भाविक आणि अनुयायांनी दिलेल्या देणगीतून त्यांनी हे पैसे जमा केले आहेत आणि ते आता राम मंदिर निर्माणासाठी देत आहेत.

दास यांनी जमा केलेल्या निधीबाबत आणि धनादेशाबाबत बोलताना ऋषिकेशमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख सुदामा सिंघल यांनी सांगितले की जेव्हा त्यांना दास नावाच्या व्यक्तीने

धनादेश जमा केला असून तो खरा आहे अथवा नाही असा गोंधळ निर्माण झाल्याचे कळाले तेव्हा ते बँकेमध्ये पोहोचले. बँकेने दास यांनी ज्या खात्यातून धनादेश दिला आहे त्या खात्यामध्ये पुरेशी रक्कम आहे अथवा नाही याची खात्री करून घेतली.

ही खात्री करून घेतल्यानंतर दास यांना बँकेने धनादेश जमा करून घेतल्याची पावती दिली. बँक आता धनादेश वठवणार असून ही रक्कम राम मंदिर निर्माणासाठी तयार करण्यात आलेल्या ट्रस्टच्या खात्यात जमा करणार आहे.

अहमदनगर लाईव्ह 24