चक्क 5 मिनिटात साडे तीन लाख मोबाईलची विक्री

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 1 जानेवारी 2021 :-चीनची प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी शाओमीने Xiaomi Mi 11 हा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध करून दिला. यानंतर एक विक्रमच झाला. केवळ आणि केवळ पाच मिनिटात तब्बल साडे तीन लाख फोन्सची विक्री झाली.

दरम्यान शाओमीने हा स्मार्टफोन 28 डिसेंबरला लॉन्च केला आणि आजपासून तो सर्व ऑनलाईन-ऑफलाईन स्टोअरवर विक्रीसाठी ठेवण्यात आला होता. स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसरसह लॉन्च झालेला हा कंपनीचा पहिला स्मार्टफोन असून तो खरेदी करण्यासाठी लोकांनी गर्दी केली.

जाणून घ्या स्मार्टफोनची फीचर्स :-

  • 6.81 इंचाचा 2K WQHD (1,440×3,200 pixels) AMOLED डिस्प्ले
  • स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसर
  • 8GB + 128GB स्टोरेज
  • 108 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा
  • 20 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा
  • 4,600mAh ची बॅटरी

जाणून घ्या किंमत :- Xiaomi Mi 11 या स्मार्टफोनची किंमत कंपनीने 3999 युआन (जवळपास 45 हजार रुपये) ठेवली आहे. हा फोन निळ्या, पांढऱ्या आणि राखाडी रंगात उपलब्ध आहे.

अहमदनगर लाईव्ह 24