अहमदनगर Live24 टीम, 6 जानेवारी 2021 :- बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या चित्रपटांची दर्शकांना आस लागून राहिलेली असते.
त्यात आता बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या ‘राधे’ सिनेमाची उत्कंठा लागून राहिली आहे.या सिनेमात सलमान खानच्या अपोझिट दिशा पाटणी दिसणार आहे.
दिशा पाटणी जॅकी श्राफ यांच्या मुलाची गर्लफ्रेंड आहे.ती या सिनेमात त्यांच्या लहान बहिणीची भूमिका साकारताना दिसणार आहे. याआधी पण या तिघांनी मिळून काम केलेले आहे.
सलमान,दिशा आणि जॅकी यांनी याआधी भारत चित्रपटात काम केलेले आहे.त्यानंतर आता हे तिघे एकत्र दिसून येत आहेत. हे तिघे मिळून ‘राधे’ चित्रपटातून दिसून येणार आहेत.
भारत सिनेमात एकही सिन असा नव्हता की हे तिघे एकत्र असतील.राधे मध्ये मात्र तस होणार नसल्याचे सांगण्यात येते. बॉलिवूड हंगामाने यासंदर्भातील वृत्त दाखवले आहे.
सलमानच्या राधे योर मोस्ट वॉन्टेड भाई चे सॅटेलाईट,थिएटर रिलीज,डिजिटल रिलीज आणि म्युझिक राईट्स झी स्टुडिओला विकण्यात आले आहेत. या डीलची किंमत थोडीथोडकी नसून तब्बल २३० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
या डीलची किंमत बॉलिवूड मध्ये सर्वात जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रभुदेवाने हा सिनेमा दिगदर्शित केला आहे. नेहमीप्रमाणे ईदच्या मुहूर्तावर चित्रपट येणार होता पण कोरोनामुळे पुढे ढकलला.