Samsung Galaxy M14 5G : सॅमसंग कंपनीचे अनेक स्मार्टफोन सध्या बाजारात उपलब्ध आहेत. तसेच कंपनीकडून ग्राहकांसाठी अनेक दमदार आणि मजबूत फीचर्स असणारे स्मार्टफोन बाजारात लॉन्च केले जात आहेत. तसेच आता कंपनीकडून मजबूत बॅटरी असणारा स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला आहे.
सोमवारी सॅमसंग कंपनीकडून 50 एमपी ट्रिपल कॅमेरा आणि 6000 mAh बॅटरीसह एक नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनमध्ये पॉवरफुल 5 एनएम प्रोसेसर देण्यात आल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.
किंमत
बाजारात सॅमसंग कंपनीचे अनेक स्मार्टफोन उपलब्ध आहेत. मात्र त्यांच्या किमतीदेखील अधिक आहेत. पण आता कंपनीकडून Samsung Galaxy M14 5G हा स्मार्टफोन ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिला आहे. या स्मार्टफोनची किंमत 13,490 रुपये 4GB 128 GB स्टोरेजसाठी तर 6GB 128 GB साठी 14,990 रुपये ठेवली आहे.
Samsung Galaxy M14 5G या स्मार्टफोनमध्ये कंपनीकडून फुल एचडी प्लस 90 हर्ट्झ डिस्प्ले बसवण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या स्क्रीनची साईज 6.6-इंच आहे. हा स्मार्टफोन ३ रंगामध्ये विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.
21 एप्रिलपासून विक्रीसाठी उपलब्ध होईल
Samsung Galaxy M14 5G या स्मार्टफोनची विक्री 21 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता सुरू होईल. अॅमेझॉन किंवा कंपनीच्या वेबसाइटवरून तुम्ही हा स्मार्टफोन खरेदी करू शकता.
सॅमसंग इंडिया मोबाईल बिझनेस संचालक राहुल पाहवा म्हणाले, “२०१९ मध्ये लॉन्च झाल्यापासून, Galaxy M सीरिजला भारतातील लाखो ग्राहकांकडून प्रेम आणि प्रशंसा मिळाली आहे. हा सिरीज पुढे नेत, आम्हाला Galaxy M14 5G, सेगमेंट डिसप्टर सादर करताना अभिमान वाटतो.”
फोटोग्राफीसाठी सर्वोत्तम स्मार्टफोन
सॅमसंग कंपनीकडून Galaxy M14 5G स्मार्टफोनमध्ये 13 एमपी फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच F1.8 लेन्स लो-लाइट देण्यात आली आहे. त्यामुळे फोटोग्राफीसाठी हा फोन सर्वोत्तम मानला जात आहे.
या फोनमध्ये जबरदस्त बॅटरी देण्यात आलिया आहे. त्यामुळे दोन दिवस या फोनची चार्जिंग टिकू शकते. स्मार्टफोन 25W फास्ट चार्जिंगला देखील सपोर्ट करतो. या स्मार्टफोनमध्ये 6000 mAh बॅटरी देण्यात आली आहे. डिव्हाइस मल्टी-टास्किंगसाठी सेगमेंट-अग्रणी 5nm Exynos 1330 प्रोसेसरद्वारे समर्थित आहे.