Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

SBI Recruitment 2023 : स्टेट बँकेत नोकरीची संधी! या पदांसाठी बंपर भरती, पेपरशिवाय थेट मुलाखत आणि जॉइनिंग, इतका मिळणार पगार

स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये कोणत्याही परीक्षेशीयवाय थेट मुलाखतीद्वारे भरती निघाली आहे. तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे.

SBI Recruitment 2023 : कोरोना काळापासून अनेक तरुणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे अनेक तरुण बेरोजगार झाले आहेत. तसेच या काळात पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या तरुणांना देखील नोकरी शोधण्यासाठी धडपड करावी लागत आहे. पण आता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची चांगली संधी आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

स्टेट बँकेमध्ये बंपर भरती निघाली आहे. या भरतीसाठी कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही. यासाठी फक्त मुलाखत घेतली जाणार आहे. जर मुलाखतीमध्ये पास झाला तर थेट स्टेट बँकेत नोकरी करण्याची संधी मिळेल. यासाठी तुम्हाला प्रथम अर्ज करावा लागेल.

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये बंपर भरती

केंद्रीय भर्ती आणि पदोन्नती विभाग (CRPD), कॉर्पोरेट सेंटर, मुंबई, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने सेवानिवृत्त अधिकारी, स्टेट बँक ऑफ इंडियाचे एमेरिटस असोसिएट्स (e-ABS) आणि इतर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. उमेदवारांनी SBI भरती 2023 अधिकृत अधिसूचना पाहावी ज्यासाठी कोणत्या पदांसाठी भरती केली जाईल आणि कोणाची भरती केली जाणार आहे हे समजेल.

शेवटची तारीख कधी आहे

जर तुम्हीही या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर तुम्हाला 30 एप्रिल 2023 पर्यंत नोंदणी कारवी लागणार आहे. 30 एप्रिल 2023 ही अर्ज करण्याची शेवटची मुदत आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने 1 एप्रिल रोजी जाहिरात (No.CRPD/RS/2023-24/02) जारी केली आहे. इच्छुक उमेदवार अर्ज करण्यासाठी sbi.co.in या वेबसाईटवर जाऊन करू शकतात.

निवड प्रक्रिया काय आहे

या नोकरीसाठी जे उमेदवार अर्ज करणार आहेत ते सर्व अर्ज शॉर्टलिस्ट केले जातील. त्यानंतर या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. १०० गुणांसाठी मुलाखत घेतली जाईल आणि पास झाल्यानंतर थेट नोकरीसाठी बोलावले जाईल.

कोणत्या पदांची भरती

चॅनल मॅनेजर फॅसिलिटेटर, चॅनल मॅनेजर सुपरवायझर आणि सपोर्ट ऑफिसर या पदांसाठी स्टेट बँकेत भरती निघाली आहे. एकूण पदांची संख्या 1022 इतकी आहे. कंत्राटी पद्धतीने ही भरती केली जाईल.

पदासाठी पगार किती असेल

चॅनल मॅनेजर फॅसिलिटेटर-एनीटाइम चॅनल (CMF-AC): 36000/- रुपये दरमहा
चॅनल व्यवस्थापक पर्यवेक्षक-एनीटाइम चॅनेल (CMS-AC): 41000/- रुपये दरमहा
सपोर्ट ऑफिसर एनीटाइम चॅनेल (SO-AC): 41000/- रुपये दरमहा