Second Hand Car : सेकंड हँड कार खरेदी करताना वापरा ही सोपी पद्धत, मिळेल अर्ध्या किमतीत नव्यासारखी कार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Second Hand Car : कार खरेदी करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र कमी बजेट असल्याने अनेकांना कार खरेदी करणे शक्य होत नाही. मात्र आता कार खरेदी करण्याचे तुमचेही स्वप्न कमी बजेटमध्ये पूर्ण होईल. आता कमी बजेटमध्ये तुम्ही सेकंड हँड कार खरेदी करू शकता.

तुम्हालाही जुनी कार कमी पैशांमध्ये खरेदी करायची असेल तर तुम्ही काही टिप्स फॉलो करून तुम्ही अर्ध्या किमतीमध्ये कार खरेदी करू शकता. यासाठी तुम्हाला थोडेसे सोपे काम करावे लागेल.

जुन्या गाड्या कुठून येतात?

तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की सेकंड हँड कार अर्ध्या किमतीमध्ये कशा मिळत आहेत. अनेक लोक कार खरेदी करत असताना त्या ईएमआयवर खरेदी करत असतात. मात्र अनेकांना हा ईएमआय भरणे शक्य होत नाही. त्यामुळे अशा कार कंपनीकडून किंवा फायनान्स कंपनीकडून परत घेऊन जातात.

या कारमध्ये कंपनीने किंवा फायनान्स कंपनीने लावलेले पैसे पुन्हा वसूल करण्यासाठी या कारचा लिलाव करण्यात येतो. याअगोदर वृत्तपत्रामध्ये याबाबत एक जाहिरात प्रसिद्ध केली जाते. त्यानंतर त्याचा लिलाव केला जातो. मात्र प्रत्येक बँकेच्या कारचा लिलाव कधी होणार आहे हे माहिती घेणे अवघड आहे. त्यामुळे तुम्ही सहज डिजिटल ऑनलाईन पद्धतीने जाणून घेऊ शकता.

e-Auction India.com

या वेबसाइटचा इंटरफेस अगदी सोपा आहे. होम पेजवर तुम्हाला लिलावाशी संबंधित अनेक पर्याय मिळतात. मालमत्ता किंवा वाहनासारखे. तुम्ही तुमच्या शहरानुसार पर्यायही निवडू शकता.

# तुम्ही तुमच्या शहराचा पर्याय निवडू शकता.

# सर्व बँक वाहने येथे सूचीबद्ध केलेली असतात

# तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तुमच्या आवडीची बँक देखील निवडू शकता.

# चांगली गोष्ट म्हणजे वाहनाची किंमत अगोदरच दिसून येते.

# तुम्ही View More वर क्लिक करताच, बाकीची माहिती देखील स्क्रीनवर दिसते.

# कारचे सर्व तपशील, लिलावाची सुरुवात आणि समाप्ती तारीख तसेच बँक अधिकाऱ्याचा संपर्क क्रमांक मिळवा.

# तुमचे वाहन निवडा आणि बँकेशी संपर्क साधा.

e-Auction India.in

हे भारत सरकारच्या नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरचे (NIC) विकसित पोर्टल आहे. सरकार ई-ऑक्शन इंडियावर अनेक प्रकारचे लिलाव आयोजित करते. उदाहरणार्थ, शेतीपासून ते इलेक्ट्रॉनिक स्क्रॅपपर्यंत.

# वेबसाइट उघडा.

# होम पेजवर उत्पादन श्रेणीनुसार लिलाव वर क्लिक करा.

# उत्पादन श्रेणीमध्ये shipping/transportation/Vehicle निवडा.

# तारीख निवडा आणि निकाल दिसेल.

# केंद्र ते राज्य सरकार काय लिलाव करत आहे, याचा तपशील समोर येईल.

# RTO वाहन कोणते आहे यासारखे सर्व तपशील तुम्हाला पाहायला मिळतील. वाहन कधी जप्त केले. लिलाव कधी सुरू होणार आणि कधी बंद होणार याची देखील माहिती तुम्हाला याठिकाणी मिळेल.

तुम्हालाही अशा प्रकारची वाहने खरेदी करायची असतील तर तुम्हाला सतत या वेबसाइटवर भेट द्यावी लागेल. एकदा तुम्हाला तुमच्या आवडीचे वाहन सापडले की, तुम्ही लिलाव प्रक्रियेत सहभागी होऊ शकता. यासाठी तुम्हाला लॉग इन करावे लागेल आणि सर्व आवश्यक तपशील भरावे लागतील.