‘सेहवाग खोटारडा’, शोएब अख्तरचा खळबळजनक खुलासा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागनं पाकिस्तानविरुद्ध मुल्तान कसोटीमध्ये 309 धावांची खेळी करत इतिहास रचला होता. अशी कामगिरी करणारा तो भारताचा पहिलाच क्रिकेटपटू होता.

मात्र याच कसोटीवेळी आणखी एक घटना घडली होती त्याबद्दल सेहवागनेच खुलासा केला होता. त्यावेळी त्याने ‘बाप हा बाप असतो’ चा किस्सा खूप गाजला होता.

हेलो अॅपवर बोलताना अख्तर म्हणाला की, विरेंद्र सेहवागनं सांगितलेल्या या गोष्टी खोट्या आहेत. मुल्तान कसोटीत असं काही झालंच नाही असं अख्तर म्हणाला.

सेहवागला त्याने कधीच हुक मारण्यासाठी सांगितलं नाही. या मुद्द्यावर गंभीर आणि सेहवागशी 2011 मध्येही चर्चा केली होती. याबद्दल गंभीरला माहिती आहे असंही अख्तरने सांगितलं.

सेहवाग म्हणाला होता की, कसोटी सामन्यावेळी शोएब अख्तर इतका वैतागला की त्यानं शॉर्ट बॉल टाकायला सुरुवात केली. तेव्हा अख्तरनं सेहवागला हुक शॉट मारायला सांगितलं.

त्यानंतर सेहवागनं अख्तरला सांगितलं की, नॉन स्ट्राइकला तुझा बाप उभा आहे त्याला हुक मारायला सांग. त्यावेळी नॉन स्ट्राइकला सचिन तेंडुलकर उभा होता.

शोएब अख्तरने या मुलाखतीत असंही सांगितलं की, मुल्तान कसोटीत कधीच सेहवागला चौकार मारण्यासाठी सांगितलं नाही.

विरेंद्र सेहवागने मुल्तान कसोटीबद्दल सांगितलं होतं की त्याला फलंदाजीवेळी शोएब अख्तर सारखं चौकार मार असं म्हणत होता. यावर सेहवागनं अख्तरला विचारलं होतं की, तू गोलंदाजी करतोयस की भीक मागतोय.

अहमदनगर लाईव्ह 24