Old AC Price : या ठिकाणी विका जुना एसी, मिळतील अपेक्षेपेक्षा दुप्पट पैसे; होईल फायदा

उन्हाळ्याचे दिवस जवळ आले आहेत आणि जर तुमचा एअर कंडिशनर खराब झाला असेल तर तो विकून तुम्हाला चांगले पैसे मिळतील. आणि तुम्ही त्यातून नवीन एसी खरेदी करू शकता.

Old AC Price : तुमच्याकडेही जुना एसी असेल आणि तो व्यवस्थित काम करत नसेल तर तो विकून तुम्ही अपेक्षेपेक्षा दुप्पट पैसे कमवू शकता. काही वेळा तुम्ही जुना एसी विकायला काढला तर तुम्हाला त्याचे योग्य पैसे मिळत नाहीत. मात्र या ठिकाणी तुम्ही जुना एसी विकला तर चांगला फायदा होऊ शकतो.

अनेकदा जुना एअर कंडिशनर व्यवस्थित काम करत नसल्याने अनेकजण तो विकून नवा घेण्याचा प्लॅन आखात असतात. मात्र त्याची योगु रक्कम मिळत नसल्याने काही वेळा तो कमी किमतीमध्ये विकून जास्त पैशांमध्ये नवीन घ्यावा लागतो. त्यामुळे जुन्या एअर कंडिशनर मागे आर्थिक फटका बसतो.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

जुन्या एसीवर या ठिकाणी मिळतील जास्त पैसे

उन्हाळ्यामध्ये एअर कंडिशनरचा वापर अधिक प्रमाणात केला जातो. त्यामुळे अनेकदा काहींच्या एअर कंडिशनरमध्ये प्रॉब्लेम येत असतो. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये उष्णता जास्त असल्याने काहींना एअर कंडिशनर बिघडल्यामुळे त्रास सहन करावा लागतो.

जुना एअर कंडिशनर विकून तुम्ही नव्या एअर कंडिशनरवर चांगली डील मिळवू शकता. जर तुम्ही जुने एअर कंडिशनर विकत असाल तर लक्षात ठेवा की ते नेहमी नूतनीकरण केलेल्या उत्पादनांची विक्री करणाऱ्या वेबसाइटवर पाठवा.

खरं तर अशा वेबसाइट्स तुमच्या जुन्या एसीला नवीन बनवतात आणि त्यातील किरकोळ समस्या दूर करतात आणि ग्राहकांना ते चांगल्या प्रकारे विक्री करतात. अशा परिस्थितीत, तुम्ही या वेबसाइट्स शोधा आणि तुमचे उत्पादन विक्रीसाठी येथे पाठवा.

जर तुम्ही तुमचे 2 ते 3 वर्षे जुने एअर कंडिशनर बाहेर विकले किंवा ऑफलाइन मार्केटमध्ये विकण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला त्यासाठी 4000 ते 5000 मिळतात, परंतु जर तुमच्या जुन्या एअर कंडिशनरची स्थिती चांगली असेल तर या वेबसाइट्सवर तुम्हाला 10000 ते 20000 रुपयांपर्यंत पैसे मिळू शकतात.