अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:-आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी बाजारात चांगली वाढ दिसून आली.
सेसेन्क्स 618 अंक म्हणजेच 1.22 टक्क्यांच्या वाढीसह 51,348.77 च्या पातळीवर बंद झाला. त्याचबरोबर निफ्टी 192 अंकांच्या म्हणजेच 1.28 टक्क्यांच्या वाढीसह 15115.80 पातळीवर बंद झाला आहे.
या शेअर्समध्ये झाली वाढ :- महिंद्रा अँड महिंद्रा, ऍक्सिस बँक, डॉ. रेड्डी लॅब, आयटीसी, सन फार्मा, इन्फोसिस, बजाज फायनान्स, एसबीआय, आयसीआयसीआय बँक , ओएनजीसी, नेस्ले या कंपन्यांच्या शेअरमध्ये वाढ झाली.
या शेअर्समध्ये झाली घसरण :- घसरण झालेल्या शेअर्सविषयी बोलताना, आज सेन्सेक्सच्या 30 पैकी 24 शेअर्स तेजीत बंद झाले आहेत.
तर दुसरीकडे ब्रिटानिया, हिंदुस्तान युनिलिव्हर, डिविस लॅब, कोटक महिंद्रा बँक आणि बजाज फायनान्स या कंपन्यांच्या समभागात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले.
आगामी आठवड्यात काही कंपन्याचे तिमाहीत निकाल जाहीर होणार आहेत. तसेच अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात तेजीचा बोलबाला दिवसेंदिवस वाढत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
अर्थसंकल्पात पुढील आर्थिक वर्षाचे 11 टक्के विकासदराचे उद्दिष्ट गुंतवणूकदारांना आश्वासक वाटत आहे. त्यामुळे खरेदीचा जोर कायम असल्याचेही सांगितले जात आहे.