अहमदनगर Live24 टीम, 30 ऑक्टोबर 2021 :- आपल्या देशात स्तनपानाविषयी महिलांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत; पण व्यस्तता, फॅशन आणि काही गैरसमजांमुळे अनेक माता आजही स्तनपान करणे टाळतात.
देशातील प्रत्येक महिलेला हे माहीत आहे की, बाळाच्या जन्मानंतर पहिल्या तीन दिवसांनंतर स्तनांमधून येणारं पिवळं, घट्ट दूध ज्यास कोलेस्ट्रम अस म्हणतात, ते बाळासाठी संजीवनी समान असते. यामध्ये पोषक पदार्थांशिवाय आजारांपासून बचाव करणारे घटकही असतात. काही माता बाळाला स्तनपान करण्यात कोणतीच कसर सोडत नाहीत.
तर काही जणी मुलांवर भरपूर प्रेम करतात, पण स्तनपान करण्याच्या बाबतीत त्या आळस करतात. सर्वेक्षणातील सत्य युनिसेफद्वारे करण्यात आलेले सर्वेक्षण सांगते की, भारतात केवळ २७५ टक्के नवजात शिशूंनाच स्तनपान मिळते. तर उर्वरीत ७५ टक्के मुलं आईचं दूध न पिताच आपलं आयुष्य पुढे ढकलतात.
हे बाळांचा मृत्यू होण्याचं सगळ्यात मोठं कारण आहे. बाळ आणि आईसाठी स्तनपान करण्याचे फायदे लक्षात घेण्यासाठी अनेक प्रयत्न सरकारी आणि खासगी पातळीवर केले जात आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ४६ टक्के मुलांनाच सहा महिन्यांपर्यंत नियमित स्तनपान केले जाते.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, मुलांना जन्माच्या एक तासाच्या आत स्तनपान सुरू करायला हवे. बाळाला पहिले सहा महिने नियमित दूध द्यायला हवे, सहा महिन्यांनंतरच हळूहळू वरचं अन्न द्यायला सुरवात करणं आवश्यक आहे. स्तनपान हे केवळ बाळासाठीच नाही, तर आईसाठीही आवश्यक आहे.
छत्तीसगडच्या महिला आघाडीवर :- ब्रेस्टफिडिंग प्रमोशन नेटवर्क ऑफ इंडियाने केलेल्या संशोधनानुसार, छत्तीसगडच्या महिला मुलांना स्तनपान करण्याच्या बाबतीत सगळ्यात पुढे आहेत.तिथे ८२ टक्के महिला आपल्या बाळाला सहा महिन्यांपर्यंत स्तनपान करतात.
पंजाबमध्ये गैरसमज :- पंजाबमधील महिलांमध्ये काही भ्रम असल्यामुळे तिथे जन्माला आलेल्या १२.७ टक्के बाळांना जन्माच्या नंतर त्वरित दूध मिळत नाही. जन्माच्या एका तासाच्या आत बाळाला स्तनपान करण्यात देशभरात पंचविसाव्या क्रमांकावर आहेत. येथे ६४.टकके महिला आपल्या बाळांना सहा महिन्यांच्या आधी अन्न देण्यास सुरवात करतात.
बिहार, उत्तर प्रदेशात परिस्थिती वाईट :- बिहार, उत्तर प्रदे आणि झारखंडची परिस्थिती पंजाबपेक्षाही खराब आहे. येथे १२ टक्क्यांहून कमी मुलांना जन्माच्या नंतर लगेच आईचं दूध मिळत नाही. येथे शिशु मृत्युदर अधिक असण्याचे हे सगळ्यात महत्त्वाच कारण आहे.
पूर्वाचलची परिस्थिती पूर्वांचलात केलेल्या एका सर्वेक्षणानुसार, तेथे हे सत्य समोर आले आहे की, जन्माला येणाऱ्या प्रति एक हजार बाळांपैकी ५२ बाळांचा मृत्यू आई बाळाला स्तनपान करण्याच्या बाबतीत उदासीन असणे हे आहे.
मुलांना धोका :- सहा महिन्यांपर्यंत बालकांना वरचं दूध, मध, तूप, पाणी, जन्मघुटी, साखरेचं पाणी देता कामा नये. यामुळे मुलांमध्ये संसर्गाचा धोका वाढतो. आईच्या दुधात पाण्याचे भरपूर प्रमाण असते.