Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Ship secrets : जहाज समुद्रात का बुडत नाही ? जाणून घ्या शेकडो टन वजन पाण्यावर कसे तरंगते ?

Ship secrets : देशात आजही मोठ्या प्रमाणात जलवाहतूक केली जाते. याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे इतर वाहतुकीपेक्षा जलवाहतूक ही कमी खर्चिक असते. ही वाहतूक जरी कमी खर्चिक असली तर वेळखाऊ असते. परंतु ही वाहतूक आरामदायी असते.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

त्यामुळे अनेकजण जलवाहतूकीला प्राधान्य देत असतात. अशातच अनेकांना जहाज या समुद्राच्या पाण्यात का बुडत नाही? तसेच जहाजाचे शेकडो टन वजन पाण्यावर कशाप्रकारे तरंगत असते? असे प्रश्न अनेकांना पडत असतात.

सध्याच्या काळातही एकूण 70 टक्के आंतरराष्ट्रीय व्यापार समुद्रमार्गे आयात आणि निर्यात करण्यात येतो. हे लक्षात ठेवा की हे काम मोठं-मोठ्या जहाजांच्या मदतीने करण्यात येते. कोट्यवधी रुपये खर्च करून बनवण्यात आलेल्या जलवाहिनीचे वजन काही हजार टन इतके आहे. अशातच त्यात काही जहाजे इतकी मोठी असतात की त्यात दुसरे छोटे शहर बसू शकेल.

त्यामुळे जहाजाला हेलिकॉप्टरप्रमाणे चाके किंवा रोटर ब्लेड नसून ही जहाजे समुद्रात कशी तरंगतात, ती का बुडत नाहीत? असा प्रश्न अनेकांना पडतो. जाणून घेऊयात सविस्तर.

जहाज न बुडण्यामागे हे आहे कारण

खरं तर, जहाजाला चाके नसून प्रोपेलर असतात.हे पंखे प्रोपेलर जहाजाखाली बसवण्यात येतात. पाण्याच्या आत फिरणारे हे प्रोपेलर खूप मोठे असून जहाजाचा वेग वाढवण्याचे काम त्यांचे आहे. ते वेगाने फिरत असून पुढे जाणारी हवा किंवा पाणी मागे ढकलत असतात. याच कारणामुळे जहाज पाण्यात बुडण्याऐवजी, ते वेगाने पुढे जाते.

तसेच हे लक्षात ठेवा की कोणत्याही जहाजातील प्रोपेलरची संख्या त्याच्या आकारावर ठरवली जाते. मोठं मोठ्या सीप्लेनमध्ये २ ते ८ प्रोपेलर बसवण्यात येतात. तर छोट्या जहाजांत केवळ २ प्रोपेलर बसवण्यात येतात.

जहाज म्हणजे लोखंड आणि पोलादापासून तयार केलेली एक पोकळ वस्तू ज्यात मोठ्या प्रमाणात हवा असते. त्यामुळे त्यातील हवेची घनता खूप कमी प्रमाणात असते. अशातच जास्त हवा असल्याने जहाजाची सरासरी घनता पाण्याच्या घनतेपेक्षा कमी होऊन जहाज हे सहज पाण्यावर तरंगत असते.

इतकेच नाही तर जहाज न बुडण्यामागे आर्किमिडीजचे तत्व काम करत असते. तर सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास ‘वॉटर शिप’ किंवा ‘मोटर बोट’चे इंजिन थांबल्यानंतरही ते पाण्यात बुडले जात नाही, कारण ते एका खास पद्धतीने बनवण्यात आलेले असते. पाण्याच्या पृष्ठभागावर उभ्या असणाऱ्या जहाजाच्या मध्यभागी दोन तुकडे केले तर दोन्ही तुकडे लगेच पाण्यात बुडले जातील.