अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- संपूर्ण जगात कोरोनावरी लसीकरण सुरू आहे. जग लवकरच कोरोनामुक्त होईल अशी आशा असताना एक वाईट बातमी समोर येत आहे.
नॉर्वेमध्ये कोरोनावरील लस टोचल्यानंतर तब्बल 23 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृतांमध्ये बहुतांश वृद्ध रुग्णांचा स्मावेश आहे. नॉर्वेमध्ये 26 डिसेंबर 2020 पासूनच कोरोना लसीकरणास सुरूवात झाली.
आतापर्यंत देशात 33 हजारहून अधिक जणांना कोरोनाची लस टोचण्यात आली आहे. नॉर्वेमध्ये ज्या लोकांना कोरोनाची लस टोचण्यात आली होती, त्यांची अचानक तब्येत बिघडली.
सरकारने दिलेल्या माहितीनुसार मृतांमध्ये वृद्ध आणि आजारी रुग्णांचा समावेश आहे. त्यांच्यासाठी लच टोचणे हे आधीच धोकादायक होते असे सरकारने म्हटले आहे.
23 मृतांपैकी 13 जणांचा मृत्यू हा कोरोना लसीमुळेच झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर इतर 10 जणांच्या मृत्यूंची चौकशी सुरू आहे. या घटनेदरम्यान चीनच्या तज्ञांनी फायझरची लस न वापरण्याचा सल्ला दिला आहे.
ही लस घाईघाईत बनवल्याचे तज्ञांनी म्हटले आहे. त्यामुळेच ही लस कोरोना थांबवण्यास अपयशी होत आहे असे त्यांनी म्हटले आहे.