Categories: भारत

धक्कादायक! बर्ड फ्ल्यूने घातल सगळीकडे थैमान

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 8 जानेवारी 2021 :- बर्ड फ्ल्यूने भारतात धुमाकूळ घातला आहे.बर्ड फ्लू ने भारतातल्या 7 ते 8 राज्यांमध्ये थैमान घातले आहे. हरियाणा मध्ये कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लूचा विषाणू मिळाला असण्याची आता पुष्टी झाली आहे.

संक्रमित कोंबड्या आता मारल्या जाव्यात, असेही आदेश देण्यात आले आहेत.त्यामुळे सगळीकडे भयभीत वातावरण झाले आहे.

अंडी आणि चिकन खाण्यात काही धोका तर नाही ना? हा प्रश्न जर तुमच्या मनात असेल तर, याचे उत्तर केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री गिरिराज सिंह यांनी दिले आहे.

माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं की, “तुम्ही बिनधास्त चिकन आणि अंडी उकडून खाऊ शकता!” त्यामुळे, आता कोणताही ताण घेण्याची गरज नाही असे केंद्रीय मंत्र्यांच्या वक्तव्यावरून तरी वाटते आहे!

पक्षांचे मृत्यू झाल्यामुळे सगळीकडे भीतीदायक वातावरण झाले आहे याचबरोबर राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि केरळ या राज्यांमध्ये सुद्धा पक्षांचे मृत्यू झाले आहेत

आणि त्यांच्या शरीरात बर्ड फ्लूचे विषाणू देखील आढळून आले आहेत. अशा परिस्थितीत सहाजिकच सामान्य माणसांना अंडी आणि चिकन यांच्या विषयी मनात शंका निर्माण होऊ शकते.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24