अहमदनगर Live24 टीम, 6 जानेवारी 2021 :- कोरोना व्हायरसच्या संदर्भात रोज नवं नवे खुलासे होत असतात.कोरोना व्हायरस हवेतून पसरू शकतो याबद्दल अजून पर्यंत फक्त चर्चा व्हायच्या पण आता त्याबाबतीत पुरावे मिळाले असल्याचे सांगण्यात येत आहे.
याबाबतचे पुरावे एका स्टडीवरून मिळाले असून त्याबाबतचा खुलासा करण्यात आला आहे. त्यासंबधिताचे पुरावे संशोधकांना मिळाले आहेत.
त्याबाबतचा अभ्यास संशोधकांकडून करण्यात आला. त्यांच्या सांगण्यानुसार कोव्हीड १९ वार्डमधे असलेल्या हवेत कोरोना व्हायरसची नमुने मिळाले आहेत.
असा दावा केला जात आहे की मोकळ्या जागेत दोन तासांहून अधिक वेळ हे विषाणू राहू शकतात. मात्र, कोणतीही लक्षणे नसलेल्या रुग्णांच्या प्रकरणात धोका काही प्रमाणावर कमी झालेला असेल.
सेंटर फॉर सेल्युलर अँड मोलेक्युलर बायोलॉजी आणि सीएसआयआर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉगींच्या स्टडीमध्ये या संबंधित अभ्यास करण्यात आला. या संदर्भातील रिपोर्ट द प्रिंट यांनी पण प्रसिद्ध केला आहे.
त्यांच्या रिपोर्टनुसार कोरोना व्हायरसची कण हवेत दोन तासांहून अधिक वेळपर्यंत राहू शकतात . अभ्यासानुसार हे कण हवेतून संसर्ग पसरवू शकतात.
अभ्यासात सांगितल्यानुसार जेव्हा कोविड १९ चे रुग्ण खोलीत जास्त वेळ घालवतात. हवेतील विषाणू दोन तासांहून अधिक काळ राहू शकतात. या स्टडीचा अद्याप आढावा देण्यात आलेला नाही.