अहमदनगर Live24 टीम,17 ऑक्टोबर 2020 :- कितीही उपाययोजना केल्या तरी भ्रष्टाचार मात्र थांबायचे नाव घेत नाही. भारताला लागलेली ती एक काळिमा आहे. कितीही पारदर्शक उपाययोजना केल्या तरी भ्रष्टाचार होताना दिसतो.
आता मध्यप्रदेश मधील खरगोन जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे दीपिका पदुकोणसह अन्य अभिनेत्रीचे फोटो
‘रोजगार ग्यारंटी जॉब कार्ड’वर लावून पैशांची अफरातफर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ग्राम पंचायतीचा सचिव आणि रोजगार सहाय्यक अधिकारी यांनी हा घोटाळा केला आहे.
अधिक माहिती अशी: जिल्ह्यातील ऑनलाईन जॉब कार्डावर ग्रामीण भागातील महिला-पुरुषांच्या जागी अभिनेत्री, अभिनेते यांचा फोटो लावण्यात आला. या कार्डवर मजुरीचे पैसेही जमा करण्यात आले.
मात्र गावकऱ्यांना आपल्या नावावर पैसे जमा झाल्याचा सुगावा लागण्यापूर्वी ही रक्कम इतरत्र वळवण्यात आली. गावकरीही मनरेगाचा कामावर जात नसल्याने
त्यांनाही याची माहिती मिळाली नाही. या प्रकरणी आयएएस अधिकारी आणि जिल्हा पंचायत सीईओ गौरव बेंगल यांनी कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved