धक्कादायक ! ‘या’ देशात महात्मा गांधींच्या पुतळ्याची तोडफोड

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, , 06 फेब्रुवारी 2022 :-   भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुतळ्याची अमेरिकेत तोडफोड करण्यात आली असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

काही अज्ञातांनी मॅनहट्टन येथील युनियन स्क्वेअरजवळ असणाऱ्या या ८ फूट उंच पुतळ्याची तोडफोड केली आहे. यामुळे भारतीय-अमेरिकन नागरिकांमध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण झालं आहे.

अमेरिकेतील भारतीय राजदुतावासाकडून या घटनेचा निषेध करण्यात आला आहे. दुतावास हा घटनेचा अत्यंत तीव्र शब्दांमध्ये निषेध करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान या प्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी दुतावासाने स्थानिक प्रशासन आणि स्टेट डिपार्टमेंटकडे विनंती केली आहे. पुतळ्याची तोडफोड करणाऱ्यांविरोधात योग्य कारवाई केली जावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.

महात्मा गांधींच्या ११७ व्या जन्मतिथीला २ ऑक्टोबर १९८६ रोजी हा ८ फूट उंच पुतळा गांधी मेमोरियल इंटरनॅशनल फाउंडेशनकडून भेट म्हणून देण्यात आला होता.

योगायोगाने, पुतळा २००१ मध्ये काढून टाकण्यात आला, २००२ मध्ये एका लँडस्केप गार्डन परिसरात तो पुन्हा उभारण्यात आला. गेल्या महिन्यातदेखील काही समाजकंठकांनी कॅलिफोर्नियात महात्मा गांधींच्या पुतळ्याची तोडफोड केली होती.