अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :-हरियाणातील मंत्री अनिल विज याना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 20 नोव्हेंबरला त्यांना को-व्हॅक्सीन डोज देण्यात आला होता. त्यांनी स्वतः सोशल मीडियावर कोरोना झाल्याची माहिती दिली आहे.
तसेच संपर्कात आलेल्यांना लवकरात लवकर कोरोना टेस्ट करुन घेण्याची मागणी केली आहे. अनिल विज यांनी सोशल मीडियावर माहिती दिली की, ‘माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
मी अंबाला कँटच्या एका सिव्हिल रुग्णालयात दाखल आहे. तसेच माझ्या संपर्कातील लोकांना लवकरात लवकर कोरोना टेस्ट करुन घ्यावी.’ कोरोना व्हायरसच्या व्हॅक्सीनच्या परीक्षणासाठी हरियाणाचे आरोग्य मंत्री अनिल विज यांनी 14 दिवसांपूर्वीच अंबालामधील हॉस्पीटलमध्ये स्वतः भारत बायोटेकची लस घेतली होती.
अनिल विज यांनी व्हॅक्सीनच्या तिसऱ्या ट्रायलसाठी वॉलंटियरसाठी आपले नाव दिले होते. हरियाणामध्ये २० नोव्हेंबर रोजी ‘कोवॅक्सीन’ या कोरोवरील लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात झाली होती.
यात अनिल विज यांनी स्वत:हून पुढे येत चाचणीसाठी तयारी दर्शविली होती. २० नोव्हेंबर रोजी विज यांनी कोवॅक्सीनचा पहिला डोस घेतला होता.
विज यांच्यासोबत २०० जणांना कोवॅक्सीनचा डोस देण्यात आला होता. दुसरा डोस २८ दिवसांनंतर देणार असल्याचं सांगितलं गेलं होतं. पण त्याआधीच अनिल विज हे कोरोना पॉझिटीव्ह असल्याचं समोर आलं आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved