कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. परंतु यामुळे अनेक मजूर विविध भागांमध्ये अडकून पडले. त्यामुळे मजुरांनी गाकडची वाट धरली.
या दरम्यान अनेक मजुरांना जीवघेण्या प्रसंगांना सामोरे जावे लागले. असाच प्रसंग गुदरलाय मूळचा झांशी येथील देवरीसिंहपुरा गावातील दामोदरवर. दामोदर आपल्या कुटुंबासह पानिपत येथे कपडा बनवणाऱ्या कारखान्यात नोकरी करायचा.
लॉकडाऊन लागू झाल्यावर त्याची पत्नी त्याला गावी जाण्यासाठी जोर देत होती. लॉकडाऊनमुळे कारखाना बंद झाला. पत्नीच्या बहिणीला मुलगी झाल्याने आम्ही गावी जाण्याचे ठरवले.
17 मे रोजी काय निर्णय होतो हे पाहू, नाही तर पायीच गावी निघू, असे पत्नी म्हणाली.लॉकडाऊन वाढल्याने आम्ही दोघे पायीच गावी निघालो. मात्र 25 किलोमीटर चालल्यावर अचानक एक ट्रक मागून आला आणि आम्हाला उडवले.
पत्नीला ट्रकने लांबपर्यंत घरसटत नेले. यातच तिचा मृत्यू झाला. पायी निघालेलो आम्ही रुग्णवाहिकेत गावी आलो. माझ्यासोबत मृतदेह असल्याने मी सहज गावी पोहोचलो, पण आता परत जाऊ शकणार नाही, असे भरल्या डोळ्याने दामोदर यांनी सांगितले.