अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2021 :- उत्तर प्रदेशमधील आग्रा जिल्ह्यात एक घटना घडली आहे.इथे एका तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडला मोबाईल मिळवून देण्यासाठी मित्राची हत्या केली आहे.
इथे पोलिसांनी आरोपीना अटक केले आहे.पोलिसांच्या म्हणण्यानुसार हि एक ब्लाइंड केस होती. तिचा तपास करणे एक आव्हानात्मक काम होते. हि घटना आग्रा शहरात घडली आहे. त्या ठिकाणी ६ जानेवारीला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे.
पोलिसांनी तपास केल्यावर कळून चुकले की त्याचे ना जितेंद्र आहे.जेव्हा पोलिसांनी खोलात जाऊन तपास केला तेव्हा कळले कि त्याची हत्या मित्रानेच केली आहे.मोनुने आपल्या गर्लफ्रेंडला मोबाईल मिळवून दिसण्यासाठी जितेंद्रचं एकाच्या मदतीने खून केला.
मोनू आणि त्याच्या साथीदाराने जितेंद्रला पकडले आणि शर्टची त्याची गळा आवळून हत्या केली आहे.जेव्हा मोनूला कळले जितेंद्र मृत झाला आहे तेव्हा मोनू आणि त्याच्या साथीदाराने त्याच्याजवळील मोबाईल घेऊन पळ काढला.