धक्कादायक! कोरोना मुक्त झालेल्या महिला डॉक्टरला शेजाऱ्यांनी घेतलं कोंडून

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

नवी दिल्ली कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर प्रयत्न सुरु आहेत. या संकटात आरोग्य कर्मचारी दिवस रात्र झटत आहेत. परंतु या डॉक्टर्सना वाईट अनुभव ही आले आहेत.

दिल्लीतील वसंतकुंज परिसरात कोरोनाची लागण झालेली महिला डॉक्टर ठणठणीत बरी होऊन परतल्यानंतर तिला सोसायटीवाल्यांनी घरात कोंडून घेण्याचा प्रयत्न केला तसेच तिला सोसायटी सोडायची धमकीही दिली.

वसंत कुंज इथल्या डॉक्टर महिलेला कोरोना झाला होता. उपचारानंतर घरी परतल्यावर त्यांच्याशी शेजाऱ्यांनी गैरवर्तन केलं. त्यांना घरात डांबून ठेवळं आणि सोसायटी सोडण्याची धमकीही देण्यात आली.

महिला डॉक्टरने तक्रारीमध्ये म्हटले आहे, सायंकाळी साडेचारच्या सुमारास शेजारी राहणाऱ्या मनिष यांनी शिव्या देत तुम्हाला कोरोना झालाय आणि इथं राहू शकत नाही असा दम दिला.

मनिषने महिला डॉक्टरवर आरडाओरड करत बाहेरून कुलुपही लावलं. महिला डॉक्टरने यानंतर पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

एकीकडे जीव धोक्यात घालून कोरोना रुग्णांची सेवा करत असताना अशी वागणूक मिळत असल्यानं महिला डॉक्टरनं संताप व्यक्त केला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24