अहमदनगर Live24 ,22 जून 2020 : पंजाबमध्ये पोलिसांनी एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. यात 3 महिलांसह 10 जणांना अटक केली आहे. तपासाअंती धक्कादायक माहिती समोर आली. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे.
वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या प्रमुखाने पोलिसांना स्पष्टीकरण दिलं की, महिलेचा पती आजारी आहे. त्यामुळे काही पैशांसाठी महिला तिची खोली भाड्याने देत होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही महिला या धंद्यासाठी आपली खोली भाड्याने द्यायच्या आणि त्याचे त्यांना पैसे मिळायचे. लॉकडाऊनमध्ये पैसे कमवायचा हाच मार्ग होता असंही यामधील एका आरोपीने सांगितलं.
या प्रकरणात ताब्यात घेतलेल्या वेश्य़ा व्यवसायाच्या प्रमुख महिलेने पोलिसांना सांगितलं की, ती आणि तिचा पती सारखे आजारी असायचे. त्यामुळे त्यांना काम करणं शक्य नव्हतं. त्यामुळे काही मुलं मुलींना घरी आणायची आणि त्याचे आम्हाला 500 रुपये मिळायचे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews