अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :-पत्नी करोनाबाधित असल्याने पेशाने डॉक्टर असलेल्या दाम्पत्यांना सोसायटीने मालकातर्फे घर सोडण्याचे आदेश दिले आहेत. वसई-विरारमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.
हे दाम्पत्य वसई पश्चिम येथील वालीव परिसरात वैद्यकीय सेवा देत आहेत. या डॉक्टरच्या पत्नी या कोरोना रुग्णाच्या सान्निध्यात आल्याने त्यांना कोरोनाची बाधा झाली आहे.
त्यामुळे ड्रीम व्हॅली सोसायटीत भाड्याने राहणाऱ्या या दाम्पत्यास घर सोडण्यास सांगितले आहे. पती पत्नी उपचारासाठी पालिकेच्या करोना केंद्रात दाखल झाले.
सोसायटीच्या समाज माध्यम समूहावर डॉक्टर आणि त्यांच्या पत्नी संदर्भात विविध अभिप्राय व्यक्त करण्यात आले आणि त्यांना सोसायटीत राहू देऊ नये अशी चर्चा सुरू झाली.
या नंतर सोसायटीच्या शिष्टमंडळाने घर मालकाला या बाबत सांगितले आणि डॉक्टरांना घर खाली करण्यास सांगावे अशी सूचना देण्यात आली.
दरम्यान, सदरची सोसायटी नोंदणीकृत नसल्याने काही रहिवासी सोसायटीचे कामकाज पाहत आहेत. त्यांच्याकडूनच दबाव वाढत आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews
This Story First Publish on Ahmednagarlive24.com