धक्कादायक ! विधान परिषदेच्या उपसभापतींनी रेल्वेखाली घेतली उडी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2020 :-कर्नाटक विधानपरिषदेचे उपसभापती एसएल धर्मेगौडा यांचा मृतदेह रेल्वे रुळांवर आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. धर्मे गौडा यांचा मृतदेह हा त्यांच्या घरापासून निकमगलूरजवळील रेल्वे ट्रॅकवर छिन्नविछन्न अवस्थेत आढळून आला.

दरम्यान घटनास्थळी पोलिसांना एक सुसाईड नोट देखील सापडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

धर्मे गौडा यांचा मृतदेह आज पहाटे 2 वाजेच्या सुमारास जंगलमय भाग असलेल्या रेल्वे ट्रॅकवर आढळून आला. 64 वर्षीय गौडा यांना अलीकडेच विधानसभेत काँग्रेसच्या नेत्यांनी घेराव घातला होता. त्यामुळे ते चर्चेत आले होते.

गौडा हे गैरप्रकारे सभागृहात घोषणा करत होते, असा आरोप काँग्रेसने केला होता. सभागृहातच काँग्रेसच्या नेत्यांनी जोरदार गोंधळ घातला होता. काही काँग्रेसच्या सदस्यांनी त्यांना खुर्चीवरून खाली खेचले होते.

गौडा यांनी सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या मोठ्या सभागृहातील अध्यक्ष प्रताप चंद्र शेट्टी यांना मदत केली होती, असा आरोपही काँग्रेस नेत्यांनी केला होता. त्यानंतर आज धर्मे गौडा यांचा मृतदेह आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

राजकीय वातावरण सुद्धा तापले आहे. धर्मेगौडांच्या मृत्यूमुळे कर्नाटकच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांचे बंधू एसएल भोजेगौडाही विधानपरिषद आमदार आहेत. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांचे ते निकटवर्तीय आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24