अहमदनगर Live24 ,3 जून 2020 : कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री चंदनाने तिच्या राहत्या घरात आत्महत्या केली आहे. चंदनाचे वय अवघे २९ वर्षांचे होते.
तिने आत्महत्या करण्यापूर्वी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओद्वारे तिचा प्रियकर दिनेशने तिला फसवल्याचा आरोप केला आहे. चंदना आणि दिनेश एकमेकांसोबत अनेक वर्षांपासून नात्यात होते.
दिनेशसोबत लग्न करण्याची तिची इच्छा होती. पण तो नेहमीच या गोष्टीसाठी टाळाटाळ करत होता. या व्हिडिओद्वारे चंदनाने सांगितले आहे की, चंदनासोबत नात्यात असताना देखील दिनेशचे एका मुलीसोबत अफेअर होते.
त्याने तिला फसवले असे ती या व्हिडिओत बोलताना दिसत आहे. चंदनाच्या वडिलांनी दिनेशविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
काही वृत्तपत्रांनी दिलेल्या बातमीनुसार दिनेशने तिच्याकडून काही महिन्यांपूर्वी पाच लाख रुपये उधार घेतले होते आणि तेव्हापासून तो तिला टाळत होता.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews