अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- सेक्स वर्करने लैंगिक संबंध ठेवताना कंडोम वापरण्यास सांगितले. एका इसमाने महिलेची गळा दाबून हत्या केल्याचा प्रकार घडला आहे.
सेक्स करताना कंडोम घालणे आरोपीस मान्य नव्हते. महिला ऐकत नसल्याने त्याने तिची हत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, कथित सेक्स वर्कर असलेल्या महिलेने संबंध ठेवण्याच्या आधी कंडोमचा वापर करण्यास सांगितले आणि यावरून त्या इसमाला राग आला.
ही घटना बंगळुरूमधील राजाजीनगर येथील आहे. ही घटना मृत महिलेच्या घरीच घडली आहे. आरोपी मुकुंद एचएच याला पोलिसांनी अटक केली आहे. तो बंगळुरूतील इलेक्ट्रॉनिक सिटी येथे राहत असल्याचे समजते. आरोपीला बुधवारी पोलिसांनी अटक केली आहे. चौकशीनंतर त्याने हत्येची कबुली दिली आहे.
महिला तिच्या घरी मुलासह राहत होती. आरोपीला भेटल्यानंतर दोघांमध्ये अडीच हजारांचा सौदा झाला. बराच वेळ बोलल्यानंतर दीड हजार रूपयांवर हा सौदा झाला. आरोपी मुकुंदने महिलेला ५०० रूपये ऍडव्हान्स दिले होते.
बसस्टॉपवरून ऑटो करत हे दोघेही महिलेच्या घरी पोहोचले. घरी पोहोचल्यावर आरोपीने महिलेला उर्वरित १००० रूपये दिले. त्यानंतर महिलेने आरोपीला कंडोमचा वापर करण्यास सांगितले. यावर आरोपीने नकार दिला आणि तो दिलेले पैसे परत मागू लागला.
महिलेने आरोपीकडून घेतलेले पैसे परत करण्यास नकार दिला. महिलेने असुरक्षित सेक्स आणि पैसे परत करण्यास नकार दिल्यानंतर त्याला आरडाओरडा करण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपी मुकुंदने तिला चाकूचा धाक दाखवला आणि पैसे मागितले.
महिलेचा विरोध वाढू लागल्यानंतर आरोपीने तिच्या पोटात चाकू खुपसला. जखमी अवस्थेत महिलेने ओरडण्याचा प्रयत्न केला तेव्हा आरोपीने तिचा गळा चिरून हत्या केली. तिथून पळून जाताना आरोपीने महिलेचे खोटे गादिने, पैसे आणि मोबाइल लंपास केला. दरम्यान पोलिसांनी आरोपीस अटक केली असून याबबत पोलिस अधिक तपास करत आहेत.