भारतीय भूमी ही देव देवतांची भूमी आहे. देशभरात अनेक देवदेवतांचे मंदिरे आहेत. या मंदिरांची आख्यायिका खूप पवित्र आहेत. सध्या मोदी सरकार मंदिर निर्माण व जीर्णोधारावर भर देत आहेत. सध्या प्रचंड बहुप्रतीक्षीत अशा श्रीराम मंदिराचे निर्माणाचे काम उत्तर प्रदेशमध्ये अयोध्या मध्ये सुरु आहे. हे कामकाज जानेवारी 2024 पर्यंत पूर्ण होईल.
हे झाले श्रीराम मंदिराबाबत. परंतु मोदी सरकार सध्या देशभरात 10 मंदिरे बांधण्याचे काम हाती घेणार आहे. देशातील ही दहा मंदिरे जगप्रसिद्ध असून ते हिंदूंची अस्मिता आहेत. आपल्या देशाची मंदिरे संपूर्ण जगात आपला अभिमान वाढवतील. याशिवाय आपल्या मंदिरांचाही आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठा वाटा आहे. येथे आपण आगामी काळात भारतात कोणती मंदिरे बांधली जाणार आहेत याची माहिती पाहणार आहोत.
1. पहिल्या क्रमांकावर आहे उमिया माता मंदिर
गुजरातमधील मेहसाणा येथील उमिया मातेचे भव्य मंदिर येत्या काळात तयार होणार आहे. सध्या या ठिकाणी अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात. या मंदिरासाठी 1500 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. 74 हजार यार्ड जागेवर हे मंदिर निर्माण केले जाणार आहे. येथे मंदिरासोबत जे भवन बांधले जाईल तेथे 1200 हून अधिक मुला-मुलींची राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. भाविकांसाठी दोन मजल्यापर्यंत पार्किंगची सुविधा याठिकाणी असणार आहे. येथे तब्बल 1000 गाड्या सहज पार्क करता येतील इतके ते भव्य असेल.
2. विराट रामायण मंदिर
मोदी सरकार हे देखी मंदिर भव्य बांधणार आहे. येथेही भाविक भक्त मोठ्या प्रमाणात येत असतात. बिहारच्या केशरिया नगरमध्ये विराट रामायण मंदिर बांधले जाईल. विशेष म्हणजे या मंदिरात जगातील सर्वात मोठ्या शिवलिंगाची स्थापना करण्यात येणार आहे. या मंदिरात तीन मजले असतील ज्यांची उंची अंदाजे 270 फूट असेल. या मंदिराचे बांधकाम 2025 पर्यंत पूर्ण होईल असे सांगण्यात येत आहे. या विशाल रामायण मंदिर संकुलात 22 मंदिरे बांधली जाणार आहेत. येथे लाखो भाविक दर्शनासाठी येऊ शकतात.
3. जम्मूमध्ये होणार तिरुपति बालाजी मंदिर
आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिर अत्यंत लोकप्रिय आहे. येथे भगवान तिरुपतीच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक देशभरातून येत असतात. आता असेच मंदिर जम्मूमध्येही बांधले जाणार आहे. जम्मूच्या व आसपासच्या भाविकांना तिरुपती बालाजी यांचे दर्शन सहज व्हावे यासाठी हे मंदिर बांधण्यात येत आहे.
या मंदिरासाठी साधारण 62 एकर जागा असणार आहे. म्हणजेच जम्मूतील तिरुपती बालाजीचे हे मंदिर 62 एकरमध्ये बांधले जाणार आहे. यासाठी सुमारे 33 कोटी रुपये खर्च शासन करणार आहे. हे मंदिर जम्मू कटरा आणि माता वैष्णोदेवीच्या मार्गादरम्यान बांधले जाईल जेणेकरून वैष्णोदेवीला येणाऱ्या भाविकांना या मंदिरात दर्शनासाठी जाता येईल.
4. सर्वात मोठे इस्कॉन मंदिर
पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यात इस्कॉनचे मुख्यालय आहे. या मुख्यालयात जगातील सर्वात मोठे मंदिर बांधले जात आहे. या मंदिराचे बांधकाम 2024 सालापर्यंत पूर्ण होईल असे म्हटले जात आहे. या मंदिराचे बांधकाम 2010 मध्ये सुरू झाले होते. या मंदिरासाठी 100 मिलियन डॉलर्सचा खर्च येईल असा अंदाज आहे. येथे दररोज सुमारे 10,000 भाविक एकाच वेळी दर्शनासाठी येऊ शकतात. हे मंदिर जगातील सर्वात मोठे वैदिक मंदिर बनेल.
5. चंद्रोदय मंदिर
उत्तर प्रदेशातील वृंदावन येथे चंद्रोदय मंदिर बांधले जाणार आहे. हे मंदिर जगातील सर्वात उंच मंदिर असेल असे म्हटले जात आहे. या मंदिराची उंची अंदाजे 700 फूट असेल. या मंदिराच्या बांधकामासाठी 700 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. संपूर्ण मंदिर दर्शनासाठी भाविकांना 2 ते 3 दिवसांचा कालावधी लागेल.