Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Skoda Upcoming Electric Cars : स्कोडा ऑटो मार्केट गाजवण्यासाठी लॉन्च करणार 6 नवीन इलेक्ट्रिक कार, जाणून घ्या सविस्तर

Skoda Upcoming Electric Cars : भारतीय ऑटो मार्केटमध्ये अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रिक कार लॉन्च केल्या आहेत. तसेच इलेक्ट्रिक कारची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे अनेक कंपन्या इलेक्ट्रिक कार लॉन्च करत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

इंधनाच्या किमती वाढल्याने अनेकजण पेट्रोल आणि डिझेलवरील वाहने खरेदी करण्याकडे पाठ फिरवत आहेत. तसेच अनेक ग्राहक सीएनजी आणि इलेक्ट्रिक कार खरेदी करण्यावर अधिक भर देत आहेत.

दिवसेंदिवस इलेक्ट्रिक कारची मागणी वाढत चालली असल्याने आता स्कोडा कंपनीकडून लवकरच भारतामध्ये ६ इलेक्ट्रिक कार लॉन्च केल्या जाणार आहेत. त्यामुळे आता इतर इलेक्ट्रिक कंपनीच्या कारला टक्कर देण्यासाठी स्कोडा इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार आहे.

स्कोडा 6 नवीन इलेक्ट्रिक कार आणणार आहे

स्कोडा ऑटो ही युरोपमधील प्रमुख कार वाहन कंपनी आहे. आता स्कोडा ६ इलेक्ट्रिक कार आणण्याच्या तयारीत आहे. स्कोडा आगामी काळात अनेक एसयूव्ही कार सादर करणार आहे, ज्या इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये धमाका करतील.

या कार्स भारतात लॉन्च होणार आहेत

स्कोडा कंपनीकडून आगामी काळात लॉन्च केल्या जाणाऱ्या कारवर वेगानी तयारी सुरु आहे. एस्टेट, एलराक आणि आणखी एका कारवर स्कोडा काम करत आहे. महिंद्रा कंपनीकडून देखील आणखी काही लॉन्च केल्या जाणार आहेत. त्यामुळे स्कोडाकडून देखील महिंद्राला टक्कर देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.

ऑटो सेक्टरमधील बातम्यांनुसार, स्कोडा यापैकी तीन कार भारतातही लॉन्च करू शकते. यात कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक कार एलराक आणि एक छोटी कार समाविष्ट आहे. Skoda Allrock SUV 2024 मध्ये बाजारात दाखल होऊ शकते.

या स्कोडा कारबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये 77kwh ची बॅटरी दिली जाऊ शकते. असे सांगितले जात आहे की ही कार फुल चार्ज केल्यावर 500 किमीची रेंज देऊ शकते. जर ही कार भारतात लॉन्च झाली तर ती थेट टाटा नेक्सॉन आणि महिंद्रा XUV 400EV शी स्पर्धा करेल.

Skoda Elrock ची अपेक्षित वैशिष्ट्ये

मॉडेल Skoda Allrock
बॅटरी 77kwh
रेंज 500km
आकार 4.5 मीटर