Smartphone 5G Setting : देशात रिलायन्स जिओ टेलिकॉम कंपनीकडून 5g इंटरनेट नेटवर्क ची चाचणी सुरु करण्यात आली आहे. तसेच देशातील अनेक शहरांमध्ये 5g इंटरनेट सुरु झाले आहे. जिओ कंपनीकडून ग्राहकांना सध्या मोफत 5g इंटरनेट सुविधा दिली जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑक्टोबर 2022 मध्ये 5G नेटवर्क सुविधा लाँच करण्यात आली आहे. तसेच एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया सारख्या मोठ्या टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या 5G सुविधा फक्त निवडक शहरांमध्ये सुरू केल्या आहेत.
पण आता अनेकांचे स्मार्टफोन 4G असल्याने त्यांना प्रश्न पडू लागला आहे की 5G नेटवर्कसाठी नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा का? पण तुम्हाला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याची काहीही गरज नाही. कारण तुम्ही तुमच्या जुन्या स्मार्टफोनमध्ये देखील 5G नेटवर्क सुरु करू शकता.
तुम्हाला तुमच्या फोनची काही सेटिंग बदलायला लागेल. त्यानंतर तुमच्या स्मार्टफोनमध्ये तुम्ही 5G नेटवर्क सुरु होईल. त्यामुळे तुम्ही सुपर फास्ट 5g इंटरनेटचा आनंद घेऊ शकता.
जर तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमध्ये 5g सुरु करायचे असेल तर त्यासाठी ३ स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. त्यानंतर तुमच्या स्मार्टफोनमध्ये 5g नेटवर्क सुरु झाल्याचे दिसेल.
5G नेटवर्क सुरु करण्यासाठी ३ स्टेप्स फॉलो करा
सर्वप्रथम, तुमच्या स्मार्टफोनवर “सेटिंग्ज” हा पर्याय उघडा.
आता वरील सर्च बारवर जा आणि “Mobile Networks” पर्याय शोधा.
आता समोर दिसणार्या “नेटवर्क मोड” नावाच्या पर्यायावर क्लिक करून, दिलेल्या पर्यायांपैकी 2G/3G/4G/LTE/VoLTE/5G पर्यायावर क्लिक करा.
या 3 स्टेप्सचे अनुसरण करून, तुम्ही तुमच्या कोणत्याही 5G स्मार्टफोनमध्ये 5G वैशिष्ट्ये सहजपणे सक्षम करू शकता, जर हा पर्याय तुमच्या स्मार्टफोनमध्ये दिसत नसेल तर तुमच्या स्मार्टफोनमध्ये 5G सक्षम नाही.
5G नेटीओक दाखवत नसेल तर तुम्हाला तुमचा स्मार्टफोन उपडेट करावा लागेल. त्यानंतर तुमच्या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला सहज 5G हा पर्याय मिळून जाईल. त्यानंतर तुम्ही 5G इंटरनेट सुविधेचा लाभ घेऊ शकता.