उष्णता, उष्णतेची लाट हे महाराष्ट्र, उत्तरप्रदेश आदी भागात नित्याचेच. या राज्यातील नागरिकांना याची जणू सवयच. तापमान अगदी ४० अंशाच्याही पुढे जाते. परंतु आता तुम्हाला ऐकून धक्का बसेल, की जेथे नेहमीच बर्फ असते अशा जम्मू आणि काश्मीरला उष्णतेच्या लाटेने हैराण केलेय.
धक्कादायक म्हणजे ही उष्णता इतकी त्रासदायी झालीये की जेथे फॅन दिसणेही मुश्किल त्या राज्यात एसीची विक्री झपाट्याने होऊ लागलीये. कडक उन्हाळ्यामुळे झेलम नदीची पाणी पातळी यंदाच्या उन्हाळ्यात चक्क निम्म्याने घटली आहे.
श्रीनगरचे तापमान जम्मूला मागे टाकून चक्क ३५.७ अंश झाले होते. यंदाचा उन्हाळा जम्मू-काश्मीरच्या इतिहासातील खडतर उन्हाळा मानला जात आहे. उष्णतेच्या लाटेचा फटका काश्मीरच्या सर्वच क्षेत्रांना बसला आहे.
तापमानाची सवय नसलेल्या काश्मिरींना चक्क एसी खरेदी करावा लागला. पर्यटकांसाठी हॉटेलांनाही एसीची खरेदी करावी लागली आहे.
रविवारी श्रीनगरने तापमानाच्या बाबतीत जम्मूलाही मागे टाकले. श्रीनगरमध्ये ३५.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले, तर जम्मूत ३५.१ अंश तापमान नोंदवले गेले.
१३२ वर्षांतील तिसरे सर्वाधिक किमान तापमान
जम्मू-काश्मीरच्या इतिहासातील गेल्या १३२ वर्षांतील तिसरे सर्वाधिक किमान तापमान रविवारी नोंदले गेले. याआधी जुलै महिन्यात नोंदले गेलेले सर्वाधिक तापमान आहे.
२१ जुलै १९८८ रोजी २५.२ अंश तापमान नोंदवले गेले होते, तर २६ जुलै २०२१ रोजी पाऱ्याने २४.८ अंशांचा टप्पा गाठला होता.
ग्लोबर्ल वॉर्मिंग?
जेथे नेहमीच थंडी असते तेथे इतकी उष्णता पाहून नेटकरी सध्या पुन्हा एकदा ग्लोबर्ल वॉर्मिंगची चर्चा करू लागलेत. हे सगळे बदल ग्लोबर्ल वॉर्मिंगचेच दुष्परिणाम आहेत अशी चर्चा सध्या होऊ लागलीये. यावर सर्वांनीच सजग होऊन उपाययोजना करणे गरजेचे असल्याचेही सर्वांचे म्हणणे आहे.