अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2021 :- काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यातच डाळी, तेल, किराणा मालाचेही दर गगनाला भिडले आहेत.
या महागाईने सर्वसामान्य पिचला जात असतानाच बांधकाम साहित्याच्या दरात कमालीची वाढ झाल्याने घर बांधणीच्या खर्चात आपोआपच वाढ होणार आहे.
परिणामी घर बांधणीसह नवीन घर खरेदी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणार असल्याने त्यांचे घराचे स्वप्नही महागणार आहे. वाळू, स्टील, सिमेंट, विटा आणि इतर बांधकाम साहित्याच्या दरात तब्बल १७ ते ६० % वाढ झाल्याने
घरांच्या किमती गगनाला भिडणार आहेत. सहाजिकच हक्काचा निवरा मिळवण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करणाऱ्यांना काहीसा हात आखडता घ्यावा लागणार आहे. तसेच बांधकाम क्षेत्रा तील उलाढालीवरही परिणामाची शक्यता आहे.
वर्षभरापूर्वी ३८ रुपये प्रतिकिलो दराने मिळणारे स्टील आता ६१ रुपयांवर पोहोचले आहे. सिमेंट बॅगमागे वर्षभरात ११० रुपयांची वाढ झाली आहे.
नैसर्गिक आणि कृत्रिम वाळूच्या दरात प्रति ब्रास ६०० रुपये, वीट पाच रुपय… एकूणच बांधकाम साहित्य खरेदी आणि मजुरीत झालेली दरवाढ पाहता याचा परिणाम घरांच्या किमतीवर होणार असल्याचे दिसून येत आहे.