अहमदनगर लाईव्ह24 टीम :- उत्तर प्रदेशच्या बलिया जिल्ह्यातील होमगार्ड विभागातील एका कर्मचाऱ्याने आपल्या नवजात मुलाचे नाव कोरोना ठेवले आहे.
उभांव पोलीस ठाणे हद्दीतील बिल्थर रोड पोलीस चौकीवर होमगार्ड म्हणून सेवा देणारे रियाजुद्दीन यांची पत्नी शमा परवीन हिने शुक्रवारी रात्री येथील सार्वजनिक आरोग्य केंद्रात एका मुलाला जन्म दिला.
यानंतर रियाजुद्दीन यांनी नवजात बाळाचे नाव कोरोना ठेवले. सध्या कोरोनामुळे जगभर दहशत पसरली आहे. कोरोनाबाबत सतर्कता बाळगण्यासाठी संदेश देण्याचे काम आपल्या मुलाने करावे म्हणून त्याचे नाव कोरोना ठेवल्याचे यावेळी रियाजुद्दीन यांनी स्पष्ट केले.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com