अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-हेल्मेटशिवाय पेट्रोल न देण्याचा नियम आधीपासून देशात लागू आहे. मात्र, असं असलं तरी अनेक लोक याकडे दुर्लक्षित करताना दिसतात. हेच लक्षात घेऊन आता यासंबंधितील नियम आणखी कठोर करण्यात आले आहेत.
कोलकाता मध्ये आता हेल्मेटशिवाय पेट्रोल देण्यास बंदी घालण्यात आली आहे. हेल्मेटशिवाय पेट्रोल न देण्याचा नियम पुन्हा लागू करण्यात आला असल्याची माहिती कोलकाता पोलिसांनी दिली.
दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातल्यास अपघातांमध्येही घट होईल. लोकांमध्ये हेल्मेट विषय जागरूकता निर्माण करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे. ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’, नियम ८ डिसेंबरपासून लागू होणार असल्याचं कोलकाता पोलिसांनी सांगितलं आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved