अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :- कोरोना काळात सोनू सूद याने अनेक लोकांना सढळ हाताने मदत केली.अनेक लोकांसाठी तो देवदूतासारखा धावून गेला. बॉलिवूडबद्दल पण आता सोनू सूद उघडपणे बोलला आहे. बॉलिवूडमधील ऐक्यावर सोनू सूदने प्रश्न उपस्थित केले आहेत.
तो म्हणतो, बॉलिवूडमध्ये ऐक्याच्या गप्पा मारल्या जातात. पण प्रत्यक्षात असे काहीही नाही. इंडस्ट्रीतील काही लोक इंडस्ट्रीवरच प्रश्न उपस्थित करतात. तेव्हा खूप दुःख होते. सोनू जेव्हा असं बोलला तेव्हा त्याने कोणाचेही नाव घेतले नाही पण त्याचा रोख कंगना रानौत वर असल्याचे कळतय.
सोनुने बॉलिवूड हंगामा ला त्याची मुलाखत दिली तेव्हा तो बोलत होता. पहिल्यादाच सोनू एवढे मन मोकळेनाने बोलला. सोनू पुढे म्हणतो,इंडस्ट्रीत फक्त यशस्वी लोकांचीच चर्चा होते. इथे अपयश आलेल्या लोकं किंमत नाही. काही लोकांनी स्वतःभोवती कुंपण घालून घेतले आहे.
जेव्हा इंडस्ट्रीतील लोकच त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात तेव्हा मी खूप दुःखी होतो. तीच इंडस्ट्री जिच्यासाठी आपण घर दार सोडून आलोत. तिने आपली स्वप्न पूर्ण केली तिला बोलल्याने तिचे किती मोठे नुकसान होत असेल याचा अंदाज तुम्ही बांधू शकता.इंडस्ट्रीतील लोकांनी सगळ्यांनी मिळून मिसळून राहायला हवे. सर्वांनी सोबत चालायला हवे. पण तीच इंडस्ट्री आता तुटताना दिसायला लागलीय. अशात प्रत्येक जण नाराज आहे.
आता या सगळ्याची साखळी तुटताना दिसत आहे. त्यामुळे मी व्यथित झालोय,दुःखी आहे असे सोनू सूद म्हणाला, सोनू सूदचा इशारा यावेळी कंगनाकडे असल्याचा लपून राहिलेल नाही.
काही दिवसांपूर्वी बलिवूड ड्रग्ज,नेपोटीझम आणि शोषणाचे गटार असल्याचे कंगना म्हटली होती. इंडस्ट्रीतील ९९ टक्के लोक ड्रग्ज घेणार असल्याचा दावा पण तीने केला होता.