लवकरच शेतकऱ्यांनी इथेनॉलपासून तयार केलेल्या इंधनावर विमाने उडणार – मंत्री नितीन गडकरी

Ahmednagarlive24 office
Published:
India News

India News : भारत सध्या बायोसीएनजी, बायोएलएनजी, इथेनॉल अशी प्रगती साधत आहे. तसेच नुकत्याच झालेल्या जी-२० परिषदेमुळे जैव इंधनाच्या निर्मितीला चालना मिळणार आहे. त्यामुळे लवकरच शेतकऱ्यांनी इथेनॉलपासून तयार केलेल्या इंधनावर विमाने उडणार आहेत, असा दावा केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे.

पुणे शहरालगतच्या बाणेरमधील युरोकुल युरोलॉजी इन्स्टिट्युटमध्ये उभारण्यात आलेल्या पहिल्या रोबोटिक युरोलॉजी सेंटरचे उद्घाटन नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी युरोकुलचे संचालक डॉ. संजय कुलकर्णी आणि डॉ. ज्योत्स्ना कुलकर्णी, म्हैसकर फाऊंडेशनच्या सुधा म्हैसकर, जयंत म्हैसकर, आमदार भीमराव तापकीर उपस्थित होते.

नितीन गडकरी म्हणाले, देशात सार्वजनिक खासगी भागीदारीमध्ये देशात अनेक कामे वेगाने सुरू आहेत. त्याचबरोबर वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत आहे.

त्यावर मात करण्यासाठी रस्ते, उड्डाणपूल उभारण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळेच बांधा, वापरा, हस्तांतरित करा, या तत्त्वावर काम सुरू आहे. दुमजली महामार्ग बांधण्याचे काम हाती घेतले आहे.

डॉ. संजय कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. डॉ. ज्योत्स्ना कुलकर्णी यांनी रोबोटिक युरोलॉजी सेंटरची माहिती दिली. बाणेर बालेवाडी मेडिकल असोसिएशनचे डॉ. राजेश देशपांडे यांनी आभार मानले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe