सौरव गांगुलीला काढले ‘या’ पदावरून; मीडियात चर्चाना उधाण

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 6 जानेवारी 2021 :-भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे अदानी ग्रुपने त्याला फॉर्च्युन राईस ब्रान कुकिंग ऑईलची जाहिरात थांबवण्यात आली आहे.

यावेळी सौरव गांगुलीला हटवण्याचे कारण अडाणी समूहाने सांगितले आहे. अदानी समूहाची कंपनी असलेल्या अदानी विल्मरने सांगितले की,सौरव गांगुलीला तात्पुरते या जाहिरातीतून काढण्यात आले आहे.

अदानी समूहाने सौरव गांगुली करत असलेल्या सगळ्या जाहिरातींमधून त्याला काढून टाकले आहे. त्यावरून चर्चाना उधाण आले होते.

उद्योगपती गौतम अदानी यांची कंपनी असलेल्या अदानी विल्मरने सौरव गांगुलीचा सहभाग असलेल्या आपल्या फॉर्च्युन राईस ब्रान कुकिंग ऑईलचा जाहिराती मागे घेतल्या आहेत.

गांगुलीला मागच्या वर्षी या कंपनीचा ब्रँड अँबेसेडर बनवण्यात आले होते.जानेवारीत तो फॉर्च्युन राईस ब्रॅन हार्ट हेल्दी ऑईलचा ब्रँड अँबेसेडर बनला होता. लॉकडाऊनच्या काळात त्याने या कंपनीच्या जाहिराती केल्या.

हृदयाला काळजी घेणारे ऑइल म्हणून याच्या जाहिराती करण्यात आल्या होत्या. यासंबंधित कंपनीने स्वतःचा बचाव करताना गांगुलीला कायम ब्रँड अँबेसेडर ठेवणार असल्याचे कळवले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24