अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2020 :-गेल्या अनेक महिन्यांपासून देशात कोरोनाचे संकट कायम आहे. यामुळे यंदाच्या वर्षी अनेक सण उत्सवावर विरजण पडले आहे. यंदाच्या वर्षी सणोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
दरम्यान येणाऱ्या नाताळच्या पार्श्ववभूमीवर नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. कोरोनाचा नवा व्हायरस अधिक वेगाने पसरत असल्याची माहिती पुढे आल्यानंतर संपूर्ण जगात काळजी घेतली जात आहे.
अनेक देशांनी यूकेमधून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली आहे. भारताने ही काळजी म्हणून विमानांवर बंदी घातली आहे. ख्रिसमसमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून सरकारने नवी नियमावली ही जाहीर केली आहे. याआधी राज्य सरकारने नाईट कर्फ्यू लागू केले होते.
काय आहे नवी नियमावली