अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :- आजच्या व्यापारी सत्रात बेंचमार्क निर्देशांकाने थोडी वृद्धी घेतली. या नफ्याचे नेतृत्व आयटी आणि फार्मा स्टॉक्सनी केले. निफ्टी ०.१४% किंवा १९.८५ अंकांनी वधारला व १३,७६०.५५ अंकांवर स्थिरावला.
तर एसअँडपी बीएसई सेन्सेक्स ०.१५% किंवा ७०.३५ अंकांनी वाढला व ४६,९६०.६९ अंकांवर स्थिरावला. आज जवळपास १,१२५ शेअर्सनी नफा कमावला, १,६११ शेअर्स घसरले तर १२२ शेअर्स स्थिर राहिले.
एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की डॉ. रेड्डीज लॅब (३.३५%), बजाज ऑटो (२.५०%), इन्फोसिस (२.३१%), विप्रो (१.७१%) आणि सिपला (१.५३%) हे निफ्टीतील टॉप गेनर्स ठरले.
याउलट इंडसइंड बँक (३.१०%), एचडीएफसी बँक (२.२८%), ओएनजीसी (१.९७%), मारुती (१.७४%) आणि आयओसी (१.३६%) हे निफ्टीतील टॉप लूझर्समध्ये सहभागी झाले.
क्षेत्रीय निर्देशांकानुसार, निफ्टी आयटी आणि निफ्टी फार्मा अनुक्रमे १.५% व १.३% नी वधारला. तर निफ्टी एफएमसीजी ०.३% नी वाढला. तर बीएसई मिडकॅप आणि बीएसई स्मॉलकॅप अनुक्रमे ०.३५% आणि ०.२४% नी घसरून लाल रंगात दिसले.
सुर्य रोशनी लि.: –कंपनीच्या स्टॉक्सनी ३.३४% ची वृ्धी घेतली व त्यांनी ३४६.५० रुपयांवर व्यापार केला. कंपनीने गॅस पाइपलाइन प्रोजेक्टसाठी एपीआय ५ एल ग्रेड ३एलपीई कोटेड व बेअर पाइप्सच्या पुरवठ्याची ऑर्डर मिळवल्यानंतर हे परिणाम दिसले. ही ऑर्डर ७२.६२ कोटी रुपयांची आहे.
एलअँडटी टेक्नोलॉजी सर्व्हिसेस लि.:- एलअँडटी टेक्नोलॉजीचा उल्लेख सीएलएसए या रेटिंग फर्मने खरेदीसाठी केला तसेच तिची टार्गेट किंमत १७५० रुपयांवरून २०२० रुपयांपर्यंत केली. त्यानंतर कंपनीचे स्टॉक्स १२.५७% नी वाढले व त्यांनी २,२०९ रुपयांवर व्यापार केला.
स्ट्राइड्स फार्मा सायन्स लि.:- कंपनीच्या ऑक्झिब्युटीनीन क्लोराइड ५ एमजी टॅबलेटला अमेरिकी एफडीएची मंजूरी मिळाल्यानंतरही कंपनीचे स्टॉक्स केवळ ०.४२% नी वाढले व त्यांनी ७७३.७५ रुपयांवर व्यापार केला.
स्टील स्ट्रीप व्हील्स लि.:- युरोपीयन बाजारासाठी जवळपास ५१,००० रुपयांची ऑर्डर मिळवल्यानंतरही स्टील स्ट्रिप्स व्हील्स कंपनीचे स्टॉक्स ०.४७% नी घसरले व त्यांनी ५११.०० रुपयांवर व्यापार केला. कंपनीच्या चेन्नई प्रकल्पातून जानेवारी आणि फेब्रुवारी २०२१ मध्ये ही ऑर्डर पुरवली जाईल.
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लि.: – फर्मची १६,००० कोटी रुपयांची बायबॅक ऑफर आज गुंतवणुकदारांसाठी खुली झाल्यानंतर टीसीएस कंपनीचे स्टॉक्स ०.४८% नी वाढले व त्यांनी २,८५१.९५ रुपयांवर व्यापार केला. ऑफरची फ्लोअर किंमत ३,००० रुपये प्रति शेअर एवढी निश्चित झाली.
भारतीय रुपया:- देशांतर्गत इक्विटी बाजारात अस्थिर व्यापारी सत्र दिसून आल्याने अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाने फारशी सकारात्मक कामगिरी न करता ७३.५७ रुपयांचे मूल्य गाठले.
जागतिक बाजार:- आजच्या अस्थिर व्यापारी सत्रात आणि वाढत्या कोरोना रुग्णांच्या चिंतेने आशियाई स्टॉक्स काही प्रमाणात घसरले तर युरोपियन स्टॉक्सनी हिरव्या रंगात कामगिरी केली. एफटीएसई एमआयबी आणि एफटीएसई १०० कंपनीचे शेअर्स अनुक्रमे ०.१३% आणि ०.१४% नी वधारले. तर दुसरीकडे निक्केई २२५ कंपनीचे शेअर्स ०.१६% व हँगसेंग कंपनीचे शेअर्स ०.६७% नी घटले.