अहमदनगर Live24 टीम, 6 जानेवारी 2021 :- नवीन वर्षाची सुरुवात झाल्यापासून शेअर बाजारात तेजी पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्याभरात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ८९५.४४ अंकांनी वधारला.
बीएसईचा सेन्सेटिव्ह इंडेक्स सेन्सेक्स मंगळवारी ०.५४ टक्क्यांनी किंवा २६०.९८ अंकांनी वाढून ४८,४३७.७८ च्या सर्वोच्च पातळीवर बंद झाला.
सेन्सेक्सने आजही ४८,४८६.२४ अंकांच्या सर्वोच्च पातळीला स्पर्श केला. त्याचबरोबर NSE चा निफ्टीही ६६.६० अंकांनी उंचावला म्हणजेच ०.४७ टक्क्यांनी वधारला आणि १४,१९९.५० गुणांसह ऑलटाइम उच्च पातळीवर बंद झाला. अमेरिकी आणि आशियातील बाजारात घसरण पाहायला मिळत असली, तरी त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर झालेला नाही.
या आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी शेअर बाजार वाढीसह बंद झाला. या शेअर्समध्ये झाली वाढ अॅक्सिस बँकेचे शेअर्स आज शेअर बाजारामध्ये अग्रणी ठरले. कंपनीच्या शेअर्समध्ये 6.31 टक्क्यांची वाढ झाली.
या व्यतिरिक्त एचडीएफसी, एचडीएफसी, इंडसइंड बँक, टीसीएस, एशियन पेंट्स, एचसीएल टेक, टायटन आणि आयसीआयसीआय बँकच्या शेअर्सनी चांगली कामगिरी केली.
या शेअर्समध्ये घसरण ओएनजीसी, बजाज फायनान्स, एनटीपीसी, महिंद्रा अँड महिंद्रा आणि रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपन्यांचा समावेश सर्वाधिक नुकसान झालेल्यांचे कंपन्यांमध्ये झाला. यांचे शेअर्स 2 टक्क्यांहून अधिक कमी झाले.