श्वास गुदमरतोय ! दिल्ली सर्वात प्रदूषित राजधानी,भारत तिसऱ्या क्रमांकावर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Air pollution : भारतात वायू प्रदूषणाची स्थिती दिवसेंदिवस अत्यंत वाईट होत असल्याचे चिंताजनक चित्र आहे. बिहारमधील बेगुसराय हे जगातील सर्वात प्रदूषित महानगर, तर दिल्ली हे जगातील सर्वात प्रदूषित राजधानी शहर ठरले आहे.

१३४ देशांमध्ये सर्वात खराब वायू गुणवत्तेच्या बाबतीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. वायू प्रदूषणाच्या बाबतीत बांगलादेश पहिल्या, तर पाकिस्तान दुसऱ्या क्रमांकावर आहे.

स्वित्झर्लंडस्थित ‘आयक्यूएअर’च्या जागतिक हवा गुणवत्ता अहवाल २०२३ नुसार भारतातील वायू प्रदूषणाची स्थिती आणखी बिकट झाली आहे. सरासरी वार्षिक ५४.४ मायक्रोग्रॅम प्रति घन मीटर पीएम २.५ कणांसह भारत १३४ देशांमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे.

या यादीत बांगलादेश ७९.९ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर आणि पाकिस्तान ७३.७ मायक्रोग्रॅम प्रति घन मीटरसह अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानावर आहेत. २०२२ साली भारत सरासरी ५३.३ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटरसह प्रदूषित देशांमध्ये आठव्या स्थानावर होता.

पीएम २.५ ला ‘फाइन पार्टिकुलेट मॅटर’ म्हटले जाते. हे अतिशय सूक्ष्म कण असतात. श्वसनाद्वारे मानवाच्या शरीरात प्रवेश करणाऱ्या य कणांमुळे विविध आजारांचा सामना करावा लागतो. बेगुसरायमध्ये सरासरी ११८.९ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर पीएम २.५ची नोंद करण्यात आली.

बेगुसराय हे जगातील सर्वात प्रदूषित महानगर ठरले आहे. २०२२ च्या क्रमवारीत तर या शहराचे नावदेखील नव्हते. तर दिल्ली २०१८ सालानंतर चौथ्यांदा जगातील सर्वात प्रदूषित राजधानीचे शहर ठरले आहे.