Categories: भारत

माजी मंत्र्याच्या PSO ची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये केला ‘हा’धक्कादायक खुलासा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

रायपूर जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. बऱ्याच ठिकाणी या आजाराच्या भीतीने आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत.

अशातच छत्तीसगडचे माजी मंत्री रामविचार नेताम यांचे पीएसओ यांनी फाशी लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. प्लाटून कमांडर छन्नराम यांनी शांतिनगर सिंचाई कॉलनीस्थित सरकारी निवासस्थानी आत्महत्या केली.

कोरोनाच्या भीतीने आत्महत्या करीत असल्याचे त्याने सुसाईट नोट मध्ये लिहिले आहे. माजी मंत्री आणि आमदार रामविचार नेताम यांचे पीएसओ छत्रराम साईंतोडे यांनी आपल्या घरात फाशी लावून आत्महत्या केली.

पीएसओ यांनी एक सुसाईट नोट लिहिली आहे. ज्यामध्ये कोरोनाच्या भीतीने आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले आहे.

भाजपा नेता आणि माजी मंत्री रामविचार नेताम यांचे पीएसओ छत्रराम शांतीनगरमधील सिंचाई कॉलनी येथील सरकारी निवास गृहात राहत होते. गुरुवारी दुपारी छत्रराम यांनी फाशी लावून आत्महत्या केली.

अहमदनगर लाईव्ह 24