कश्मीरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. दोन सीआरपीएफ जवानांनी बंदुकीने गोळी घालून आत्महत्या केली आहे. बंगाली बाबू आणि फतेह सिंह असे मृतांची नावे आहेत.
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार फतेह सिंहला वाटले की त्याला कोरोनाची लागण झाली आहे. आपल्याला कोणी स्पर्श केल्यास त्या व्यक्तीला कोरोनाची लागण होईल अशी भिती फतेह सिंहला होती.
म्हणून त्याने आत्महत्या केली असे सांगितले जाते. परंतु अधिकृतरित्या या माहितीला दुजोरा मिळालेला नाही. अधिक माहिती अशी, बंगाली बाबू हा 46 वर्षीय जवान कश्मीरचा करण नगरमध्ये राहत होता होता.
तो कुठल्याच प्रकारे निराश वाटत नव्हता. सोमवारी तो चेक पॉईंटवर ड्युटीवर होता. ड्युटी आटोपून तो घरी परतला आणि घरी गोळी झाडून त्याने आत्महत्या केली आहे. तर दुसरा जवान फतेह सिंह हा अनंतनागमध्ये ड्युटीवर होता.
त्याने स्वतःवर गोळी झाडून घेतली. फतेह सिंहला तत्काळ जवळच्या इस्पितळात दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. फतेह सिंह मूळच्चा राजस्थानचा रहिवासी होता.