Sukanya Samriddhi Yojana : देशाची सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असणारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया ग्राहकांना आर्थिक फायदा देण्यासाठी सध्या अनेक योजना राबवत आहे. ज्याचा फायदा घेत तुम्ही तुमच्या येणाऱ्या काळासाठी मोठी रक्कम जमा करू शकतात.
या लेखात आज आम्ही तुम्हाला बँक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अशाच एका जबरदस्त योजनेबद्दल माहिती देणार आहोत ज्यामध्ये मुलीच्या लग्नासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया 15 लाख रुपये देत आहे. चला मग जाणून घेऊया या योजनेबद्दल संपूर्ण माहिती.
सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत मुलींना पूर्ण 15 लाख रुपये देत असल्याची माहिती एसबीआयकडून देण्यात आली. ही रक्कम मुलीच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी वापरली जाऊ शकते.
एसबीआयने एक ट्विट केले, ज्यामध्ये बँक मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजनेवर काम करत असल्याचे सांगण्यात आले. यामध्ये फक्त 250 रुपये गुंतवावे लागतील आणि तुमची मुलगी करोडपती होईल.
सुकन्या समृद्धी योजनेचे सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्य म्हणजे ते हमी उत्पन्नाचा लाभ देते. यासोबतच कर सवलतीचाही लाभ मिळतो. हे विशेषतः मुलीसाठी आहे.
सध्या सुकन्या समृद्धी योजनेत 8 टक्के व्याज दिले जात आहे. पूर्वी 7.6 टक्के दराने व्याज मिळत असले तरी सुकन्या समृद्धी योजना 2 मुलींसाठी घेता येते. मात्र पहिली मुलगी झाल्यानंतर आणखी दोन जुळ्या मुली असतील तर अशा परिस्थितीत तिन्ही मुलींना या शासकीय योजनेचा लाभ मिळणार आहे.
सुकन्या समृद्धी योजनेत जास्तीत जास्त 15 वर्षांसाठी खाते उघडता येते. दुसरीकडे जर तुम्ही योग्य वेळी या खात्यात पैसे जमा केले नाहीत, तर तुम्हाला 50 रुपये दंड भरावा लागेल.
हे पण वाचा :- Modi Government News : मोठी बातमी ! आता ‘या’ लोकांना भरावा लागणार नाही आयकर , मोदी सरकारची घोषणा