भोपाळ कोरोनाच्या थैमानापासून वाचण्यासाठी शास्त्रज्ञ अनेक उपाययोजना करत आहेत. त्यात आयुष मंत्रालयाने काही होमिओपॅथी औषधं यावर फायदेशीर ठरू शकतात असे सांगितले होते.
मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये होमिओपॅथी औषधांचा प्रयोग करण्यात आला. यामुळे 3 कोरोना रुग्ण बरेही झाले आहेत. कोरोनाव्हायरसविरोधात सध्या इतर आजारांवरील औषधांचं ट्रायल केलं जातं आहे.
त्यापैकी एक आहे ते म्हणजे हायड्रोक्लोरोक्वीन हे अँटिमलेरिया औषध. मात्र या औषधासह मध्य प्रदेशमध्ये कोरोना रुग्णांना होमिओपॅथी औषधंही देण्यात आली आणि त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे.
भोपाळच्या गव्हर्नमेंट होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये 13 मे रोजी 3 कोरोना रुग्णांना दाखल करण्यात आलं होतं.
त्यांच्यामध्ये कोरोनाव्हायरसची सौम्य लक्षणं होती. त्यांच्यावर होमिओपॅथी पद्धतीने उपचार सुरू होते. दहा दिवसांनंतर त्यांची तपासणी करण्यात आली आणि हे तिघंही स्वस्थ असल्याचं दिसून आलं.