भारत

Surya Grahan Effect Pregnant women : गर्भवती महिलांवर सूर्यग्रहणाचा काय पडणार प्रभाव? या काळात गर्भवतींनी काय करू नये? जाणून घ्या सविस्तर

Surya Grahan Effect Pregnant women : उद्या म्हणजेच २० एप्रिल २०२३ रोजी वर्षातील पहिले सूर्यग्रहण होणार आहे. या काळात अनेकदा गर्भवती महिलांना विशेष काळजी घेण्यास सांगितले जाते. तसेच धार्मिक दृष्टिकोनातून अनेक अशुभ गोष्टी घडत असतात.

उद्याच्या पहिल्या सूर्यग्रहणाच्या वेळी अनेक गर्भवती महिलांना विशेष काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे. तसेच या काळात शुभ कार्य करण्यास देखील मनाई करण्यात आली आहे. जर या काळात गर्भवती महिलांनी काही कार्य केल्यास त्याचा परिणाम जन्मणाऱ्या बाळावर होऊ शकतो.

तसेच ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यग्रहणाचा अनेक राशींवर सकारात्मक प्रभाव पडणार आहे तर काही राशींवर सूर्यग्रहणाच्या नकारात्मक प्रभाव पडणार आहे. त्यामुळे अनेकांना काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे.

सूर्यग्रहण काळात गर्भवती महिलांनी काय करू नये

गरोदर महिलांनी ग्रहण काळात घराबाहेर पडू नये तसेच ग्रहण पाहू नये.
सूर्यग्रहण काळात गर्भवती महिलांनी चाकू-कात्री किंवा कोणतीही तीक्ष्ण वस्तू वापरू नये, तसेच या वस्तू हातात घेऊ नये.
ज्योतिषांच्या मते, सूर्यग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी दुर्वा घास सोबत ठेवावा आणि संत गोपाल मंत्राचाही जप करावा.
गर्भवती महिलांनी सूर्यग्रहण संपल्यानंतर लगेचच स्नान करावे. यासोबतच ग्रहणकाळात परिधान केलेले कपडे दान करावेत.
गरोदर महिलांनी ग्रहण काळात अन्न खाणे टाळावे.
गरोदर महिलांनी ग्रहणाच्या वेळी घरात कुठेही कुलूप लावू नये कारण याचा बाळाच्या अवयवांवर वाईट परिणाम होतो.
गरोदर महिलांनी ग्रहणकाळात धातूचे दागिने किंवा सेफ्टी पिन, हेअर पिन इत्यादी घालणे टाळावे.
ग्रहण काळात गर्भवती महिलांनी झोपू नये.
ग्रहणकाळात गर्भवती महिलांनी उठताना आणि बसताना काळजी घ्यावी. यावेळी तुम्ही हात किंवा पाय दुमडून बसू नये.

सूर्यग्रहण 2023 वेळ

सूर्यग्रहण तारीख – 20 एप्रिल

सूर्यग्रहण सुरू होते – सकाळी 07:05 पासून

ग्रहणाचा खग्रास -08:07 वाजता असेल आणि सूर्यग्रहणाचा मध्यभाग सकाळी 09:45 पर्यंत असेल.

ग्रहण संपेल – दुपारी १२:२९ वाजता

सूर्यग्रहणाचा एकूण कालावधी 05 तास 24 मिनिटे

Ahmednagarlive24 Office

Recent Posts