अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :-चित्रपट अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर या प्रकरणात अनेक वळणे आली. अनेक खुलासेही झाले. सध्या CBI हा तपास करत असून रिया चक्रवर्ती जास्त टार्गेटवर असल्याचे दिसते.
परंतु आता एक धक्कादायक खुलासा आला समोर आहे. सुशांत आणि अभिनेत्री सारा अली खान हे बँकॉकच्या हॉटेलरूममध्ये तीन दिवस एकत्र होते असा खुलासा साबिर अहमदने केला आहे.
सुशांत त्याच्या सहा मित्रांसोबत बँकॉक ट्रिपला गेला होता. या ट्रिपमध्ये सुशांतसोबत असलेल्या साबिर अहमदने नवा खुलासा केला आहे. एका मीडियाला दिलेल्या मुलाखतीत साबिर म्हणाला,
की सुशांतच्या पीआरओ टीमसाठी बँकाँग ट्रिपचं आयोजन करण्यात आलं होतं. सुशांतसोबत ‘केदारनाथ’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री सारा अली खानसुद्धा या ट्रिपमध्ये सहभागी झाली होती.
सुशांत, सारा अली खान, सिद्धार्थ गुप्ता, कुशल झवेरी, अब्बास, सुशांतचा बॉडीगार्ड मुश्ताक आणि मी असे सात जण यात होतो असे तो म्हणाला. डिसेंबर २०१८ मध्ये प्रायव्हेट जेटने आम्ही गेलो होतो.
ट्रिपच्या पहिल्या दिवशी आम्ही सगळे मिळून समुद्रकिनारी गेलो होतो. पण नंतर सुशांत आणि सारा बाकीचे सर्व दिवस हॉटेलच्या रुममध्येच होते.
आम्ही बाहेर फिरायला गेलो होतो. तसेच त्यावेळी त्सुनामीची शक्यता वर्तवण्यात आल्याने बँकॉकची ट्रिप लवकर आटोपल्याचं साबिरने सांगितलं.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved