Categories: भारत

सुशांत प्रकरण : ईडीच्या तपासात अंकिता लोखंडेबद्दल ‘ही’ धक्कादायक माहिती समोर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,15 ऑगस्ट 2020 :-अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात ईडीचा तपास सुरू आहे. ईडीच्या तपासात सुशांतने त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेला मालाडमध्ये साडेचार कोटींचा फ्लॅट खरेदी करून दिल्याची माहिती समोर आली आहे.

याचे ईएमआयही सुशांतच भरत होता. सध्या अंकिता याच फ्लॅटमध्ये राहते. हा फ्लॅट सुशांतच्याच नावावर आहे. सुशांत आणि अंकिता तब्बल सहा वर्षे रिलेशनशीपमध्ये होते.

२०१६ ला ते लग्नही करणार होतो. त्यामुळं त्यांनी एक घर खरेदी केलं होतं. दोघंही या घरात राहायचे. परंतू अचानक दोघांमध्ये काही तरी बिनसलं आणि त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

ब्रेकअप झाल्यानंतर सुशांतनं ते घर सोडलं आणि तो वांद्रे इथं घर भाड्यानं घेऊन राहू लागला. त्यांच्या ब्रेकअपनंतरही सुशांतच अंकिताच्या घराचे हफ्ते फेडत होता हे समोर आलं आहे.

रियाने केलेल्या दाव्यानुसार सुशांतला हा फ्लॅट खाली करायचा होता. मात्र अंकिता हा फ्लॅट सोडण्यास तयार नव्हती. ईडीने याबाबत अधिक तपास सुरू केला आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी राहत्या घरात आत्महत्या केली होती. त्यानंतर या प्रकरणात अनेक वळणे आली. रोज नवनवीन स्टेटमेंट या प्रकरणात केली जात आहेत. यात राजकारणही तापू लागले आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24