सुशांतच्या प्रेयसीने त्याच्या खात्यातून लांबवले तब्बल ‘इतके’ कोटी रुपये

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :-बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी राहत्या घरी आत्महत्या केली. त्यानंतर विविध तर्कवितर्कांना उधाण आले. पोस्टमार्टम रिपोर्टमधून सुशांतनं आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं.

परंतु त्यानंतर अनेकांवर आरोप-प्रत्यारोप झाले. त्यानंतर पोलिसांनी अनेकांची या प्रकरणी चौकशी केली. आता सुशांतच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पाटणा

येथील राजीव नगर पोलीस ठाण्यात सुशांतची प्रेयसी अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी केलेल्या आरोपानुसार, रियाने सुशांतला प्रेमाच्या जाळ्यात ओढून पैशांची मागणी केली.

त्याने पैशांची मागणी पूर्ण न केल्याने रियाने त्याला मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. शिवाय, रियाने त्याच्या खात्यातून १७ कोटी रुपये काढल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.

आरोपी म्हणून ‘बड्या हस्ती’ असा उल्लेख करताना के. के. सिंह यांनी कुणाच्याही नावाचा उल्लेख मात्र केलेला नाही. सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिच्यावर मात्र त्यांनी थेट आरोप केला आहे.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

अहमदनगर लाईव्ह 24